अहमदनगर (वैभव निकम) – गुलमोहर रस्ताची बऱ्याच वर्षांपासून दयनीय अवस्थेत होती. आता काम सुरू झाल्यानंतर आम्हा सर्व रहिवाशांना आनंद व समाधान झाले होते. या रस्त्याचे काम मंजुर लांबी व रुंदी नुसार उत्तम दर्जाचे व्हावे म्हणून आम्ही दिनांक २३ / १२ / २०२१ रोजी आपणास समक्ष भेटून निवेदन दिले होते. त्यानंतर काम सुरू झालेले आहे. परंतु ते अत्यंत संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे दि. ३१/३/२०२२ रोजी स्थानिक नगर सेवकांनी आपल्याला कल्पना देऊन आंदोलन देखील केले होते. त्यावेळेस आपण ३१ / ५ / २०२२ अखेर काम पूर्ण करण्याचे आश्वासन देखील दिले होते.
तरी देखील सदर ठेकेदार जाणुनबुजून अत्यंत निकृष्ट दर्जाचे व संथ गतीने काम करत आहे. त्यामुळे स्थानिक रहिवासी यांना सदर रस्ता वापर करण्यास अत्यंत त्रास होत आहे. रस्त्यावर बारिक खड़ी व कच टाकलेली असल्याने वृद्ध तसेच महिला व नागरिक घसरून पडून जखमी होत आहेत त्यास ठेकेदार व महापालिका प्रशासन जबाबदार आहे.
सदर गुलमोहर रस्त्याचे काम हे अत्यंत संथ गतीने चालू आहेच परंतु त्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. खड़ी ही विहीरीच्या खडकाची आहे. त्यामुळे सदर रस्त्याचा पाया हा लवकरच ठिसुळ होऊन जाणार आहे. पर्यायाने रस्ता खराब होण्याची शक्यता आहे. महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गुलमोहर रस्त्याचे काम संथ गतीने व निकृष्ट दर्जाचे सुरू आहे त्यामुळे या परिसरातील नागरिक शंका व्यक्त करीत आहेत.
सदर गुलमोहर रस्ता हा डी.पी. रोड असून मंजूर लेआऊट नुसार तो १८ मीटर रुंदीचा आहे. परंतु या स्थितीत गुलमोहर रस्ता हा अतिक्रमणामुळे पूर्ण रूंदीचा मिळून येत नाही. त्यावरील अतिक्रमण काढण्याबाबत आपल्याला दिनांक २३/१२ /२०२१ च्या निवेदनात देखील कल्पना दिलेली होती. अद्याप पर्यंत टाऊन फ्लॅनिंग विभाग व अतिक्रमण विभाग यांनी कुठलीही कारवाई केलेली दिसत नाही. वेळोवेळी नागरीकांनी संबंधी अधिकाऱ्यांना समक्ष भेटून तसेच रोड साईटवर भेटून याबाबत खंत बोलून दाखवली आहे.
मनपा आयुक्त यांनी जातीने लक्ष घालून रस्त्याचा दर्जा तसेच रूंदी करणाबाबत अतिक्रमणा बाबत स्वतः पाहणी करून तातडीने त्याबाबत योग्य ती कारवाई करावी अन्यथा गुलमोहर परिसरातील नागरिक तिव्र आंदोलन करतील तसेच वेळ पडल्यास न्यायपालिकेकडे योग्य ती दाद मागतील यास सर्वस्वी पालिका प्रशासन जबाबदार राहील अशे आशायाचे निवेदन उपायुक्त श्रीनिवास कुऱ्हे यांना देण्यात आले. यावेळी शिरीस जाणवे, महेश घावटे, प्रदीप घोडके, अभय खाबिया, अशोक गिरी, पंकज गुजराती, ॲड. लक्ष्मीकांत पटारे आदी उपस्थित होते.