Home Uncategorized दम मारो दम…गुलमोहर रोड परिसरात गांजा पिणाऱ्यांचा भरतो अड्डा… यात असतात अल्पवयीन...

दम मारो दम…गुलमोहर रोड परिसरात गांजा पिणाऱ्यांचा भरतो अड्डा… यात असतात अल्पवयीन मुलं-मुली….

अहमदनगर दि २९ मे

पुणे येथील हिट अँड प्रकरणानंतर अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत अल्पवयीन मुले व्यसनाच्या आहारी गेल्याचं लक्षात येत असतानाच मोठमोठे पब आणि त्या ठिकाणी अल्पवयीन मुलांची उपस्थिती ही फार मोठी गंभीर बाब आहे. मात्र जेव्हा दोन जीव गेले त्यानंतर या गोष्टी समोर आल्या ज्या तरुण-तरुणीचा मृत्यू अल्पवयीन मुलाच्या कारच्या धडकेत झाला खऱ्या अर्थाने त्या दोघांच्या मृत्यूने अनेक धक्कादायक गोष्टी समोर आणल्या कशाप्रकारे सिस्टीम काम करते आणि धनदांडग्या लोकांना वाचवण्यासाठी किती जण पुढे येतात हेही या गोष्टीतून समोर आले.

प्रत्येक शहरात अल्पवयीन मुलं हे व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत ते व्यसन मोबाईल मध्ये गेम खेळण्याचा असेल. मोबाईल वर जुगार खेळण्याचा असेल, आयपीएल सट्टेबाजी असेल त्याचबरोबर सिगरेट, गांजा आणि गुटखा या प्रकारच्या व्यसनाच्या विळख्यात आजची तरुणाई गुंतत चालली आहे.

अहमदनगर शहरातील गुलमोहर रोड परिसर हा उच्चभ्रू लोकांचे राहण्यासाठी ठिकाण म्हणून समजला जातो मात्र याच गुलमोहर रोडवर संध्याकाळी एक ठिकाणी गांजा पिण्याचा अड्डा भरतो यावर विश्वास बसणार नाही मात्र ही परिस्थिती सत्य आहे. गुलमोहर रोड परिसरातील एक ठिकाणी सध्या अंधार पडल्यानंतर गांजा ओढण्यासाठी अनेक तरुण एकत्र येतात तरुणांबरोबर तरुणीही या ठिकाणी गांजा पीत असल्याचं समोर आले आहे. अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी हा प्रकार सुरू असून या ठिकाणी सर्व अल्पवयीन मुलच आहेत छोट्या टपऱ्यात मागे आणि एका नाल्याजवळ हा प्रकार सर्रास सुरू आहे.त्यामुळे अशा या गांजा ओढण्या प्रकारामुळे तरुणाई बिघडत तर चाललीच आहे मात्र या मुळे एखादी मोठी दुर्घटना ही यामुळे घडू शकते. त्यामुळे अशा ठिकाणावर पोलिसांनी छापा टाकून गांजा ओढणाऱ्यांवर तसेच गांजा विक्री करणाऱ्यांवर आणि गांजा ओढण्यास जागा उपलब्ध करून देणाऱ्या आडोसा करणाऱ्या लोकांवर कारवाई करणे गरजेचे आहे.

तरुणांना ज्या वयात कळत नसते त्याच वयात त्यांचे पाऊले चुकीच्या दिशेने पडत असतात मात्र घरातील थोर मोठ्यांनी या गोष्टी लवकर लक्षात घेऊन वेळीच या गोष्टींपासून त्यांची सुटका केली नाही तर पुढे पश्चाताप करण्याशिवाय पर्याय नसतो त्यामुळे आपली अल्पवयीन मुले नेमकं कोणावर राहतात कुठे जातात याकडेही पालकांनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

या गांजा ओढण्याबरोबरच आता अल्पवयीन मुला-मुलींचे पावले कॅफे हाऊसकडे वळताना दिसतात बंद कॅफे हाऊस मध्ये अनेक धक्कादायकृत्य सुरू असून यामुळेही तरुणाई बिघडत चालली आहे.अशा गांजा पिण्याच्या ठिकाणांवर आणि कॅफे वर लवकरात कारवाई करावी अशी मागणी आता समोर येऊ लागली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version