अहमदनगर – दि.3 ऑक्टोबर
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची काँग्रेसच्या मंगल भुजबळ यांनी त्यांच्या पुणे येथील निवासस्थानी भेट घेऊन राज्यातील कंत्राटी कर्मचारी यांच्या शासकीय सेवा समावेशनासाठी नुकत्याच 30 सप्टेंबरला प्रसिद्ध केलेल्या राज्यस्तरीय सेवा जेष्ठता यादी संदर्भात चर्चा केली.या यादीत अनेक कर्मचारी यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता नुसार पद मिळाले नाही तसेच यादीत 50 नावे बनावट अशी आहेत की जे आरोग्य विभागात कोणत्याही पदावर काम करत नाहीत तसेच ज्या कंत्राटी कर्मचारी यांची 10 वर्ष पूर्ण असूनही राज्याच्या काही जिल्ह्यातील जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी व आरोग्य अधिकारी तसेच महानगरपालिकेचे आयुक्त व आरोग्य अधिकारी यांच्या संयुक्त सहीने नावे जाणे अपेक्षित असताना तसे न होता फक्त आरोग्य अधिकारी यांच्या स्वाक्षरीने नावे पाठवल्यामुळे काही आरोग्य अधिकारी यांनी मनमानी करत स्थानिक लेवल वरून जाणीवपूर्वक काही नावे डावलले त्यासंदर्भात मंत्री मोहदय संबंधीत अधिकारी यांच्यावर कारवाई करणार का असा प्रश्न त्यांना विचारला असता त्यांनी संबंधीत अधिकारी यांनी जाणीवपूर्वक असे केले असेल तर यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन देऊन 10 वर्ष पूर्ण असलेल्या ज्या कर्मचारी यांचे नावे स्थानिक लेवलवरून पाठवली गेली नाहीत त्यांनी 7 ऑक्टोबर पर्यंत हरकत अर्ज करून शासनाच्या निदर्शनास या गोष्टी आणुन देऊन 8 ऑक्टोबरला त्या हरकती वर रिमार्क घेऊन ती यादी DD कडे पाठविण्यास सांगितले.
तसेच या संदर्भात स्वतः मंत्री तानाजी सावंत यांनी डीडी स व मुख्य कार्यकारी अधिकारी व आयुक्त यांना फोन करून यादी संदर्भात दुरुस्तीच्या सूचना देऊन सर्वाना न्याय मिळेल अशी भूमिका घेण्यास सांगितले..