Home Uncategorized उई सपोर्ट ज्योती गडकरी… सोशल मीडियावर पोस्टर चांगलेच व्हायरल.. तर तमाम सकल...

उई सपोर्ट ज्योती गडकरी… सोशल मीडियावर पोस्टर चांगलेच व्हायरल.. तर तमाम सकल हिंदू समाजाच्या महिला ज्योती गडकरी यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरतील स्मिता अष्टेकर

अहमदनगर दि.१८ जानेवारी
अहमदनगर शहरात मकर संक्रांतीच्या दिवशी सायंकाळी जे जे गल्ली आणि घास गल्ली परिसरामध्ये तुफान दगडफेकीचा प्रकार घडला होता. त्यानंतर पोलिसांनी तातडीने धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि त्यानंतर या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही फुटेज आणि नागरिकांनी काढलेल्या व्हिडिओ च्या माध्यमातून जे दंगेखोर लोक दगडफेक आणि हातात कोयते घेऊन नागरिकांवर दहशत करत होते त्यांना अटक करण्याची भूमिका पोलिसांनी घेतली होती.

मात्र यानंतर तोफखाना पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी एका समाजावर अन्याय केला म्हणून त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते. मात्र त्यावेळी जी परिस्थिती होती ती ज्योती गडकरी यांनी योग्य पणे हाताळून कारवाई केली असल्याचं हिंदू संघटनांच्या विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना भेटून सांगितले होते.

तर त्यानंतर गेल्या 24 तासापासून सोशल मीडियावर तोफखाना पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांचे विविध प्रकारच्या पोस्ट चांगल्याच व्हायरल होत असून उईसपोर्ट ज्योती गडकरी अशा या पोस्ट व्हायरल होत आहेत.अनेक तरुणांच्या फेसबुक वर इंस्टाग्राम वर आणि व्हाट्सअप स्टेटस वर या पोस्ट पाहायला मिळू लागल्या आहेत.

 

तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या स्मिता अष्टेकर यांनी ज्योती गडकरी यांनी जी भूमिका घेतली आहे ती योग्य असून जर चुकीच्या पद्धतीने त्यांच्यावर आरोप केले जात असेल तर तमाम सकल हिंदू समाजाच्या महिला त्यांच्या बाजूने रस्त्यावर उतरतील असा इशाराही स्मिता अष्टेकर यांनी दिला आहे.

अहमदनगर शहरात अशी घटना पहिल्यांदाच घडत असून एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला सपोर्ट देऊन त्याचे स्टेटस सोशल मीडियावर फिरवण्याची ही घटना प्रथमच घडत आहे. मकर संक्रांतीचे दिवशी झालेली घटना अत्यंत निंदनीय असून पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता योग्य ती कारवाई करावी आणि हातात कोयते घेऊन फिरणाऱ्या टवाळखोर समाजकंटकांवर कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून होत आहे

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version