Homeक्राईमअपहरण करून मारहाण करणाऱ्या निखील राजकुमार लुने वर बेकायदेशीर सावकारीचा गुन्हा दाखल

अपहरण करून मारहाण करणाऱ्या निखील राजकुमार लुने वर बेकायदेशीर सावकारीचा गुन्हा दाखल

advertisement

अहिल्यानगर दि. 17 जानेवारी
एमआयडीसी परिसरातून ऐका तरुण उद्योजकाचे अपहरण करून मारहाण करणाऱ्या निखील राजकुमार लुने याच्यावर बेकायदेशीर सावकरीचा गुन्हा गुरुवारी कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. निखील राजकुमार लुने याने पैशांसाठी उद्योजाकाचे अपहरण केले होते. महेश सुरेश गावडे यांचे अपहरण करून त्यांना मारहाण केल्याप्रकरणी महेश गावडे यांच्या फिर्यादीवरून याआधी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयातील अल्ताफ अब्दुल कादर शेख यांनी महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 मध्ये कलम 39 नुसार फिर्याद दाखल केली आहे या फिर्यादीवरून निखील राजकुमार लुने याच्यावर कोतवाली पोलीस ठाण्यात बेकायदेशीर सावकारीचा दाखल करण्यात आला आहे.महेश गावडे यांनी लून याच्याविरोधात उपनिबंधकांकडे तक्रार केली होती. या तक्रारीची चौकशी केली असता लून या हा बेकायदशीरीत्या सावकारी करत असल्याचे समोर आले.

महेश गावडे यांनी निखिल लुने याच्याकडून दहा लाख रुपये घेतल्यानंतर निखिल लूने हा दर महिन्याला या रकमेवर दहा टक्के व्याज घेत असल्याचं समोर आले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular