अहमदनगर दि.४ ऑगस्ट
भारताचे स्वातंत्र्याचे 75 वर्ष साजरे करण्यासाठी सर्व शहरांमध्ये तयारीही सुरू झाली आहे. हा स्वातंत्र्यदिन खास बनवण्यासाठी सरकार ‘हर घर तिरंगा’ मोहीमही राबवत आहे. याअंतर्गत लोकांना तिरंगा फडकवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्व नेते आणि लोकप्रिय व्यक्तींनी सोशल मीडिया अकाउंटवरील प्रोफाइल फोटो बदलून तिरंगा लावला आहे.
स्वातंत्र्यदिन जवळ आल्याने देशवासीय तिरंगा खरेदी करत आहेत. जर तुम्हाला 15 ऑगस्टला तुमच्या घरी राष्ट्रध्वज फडकवायचा असेल तर महानगर पालिकेच्या मुख्य कार्यालया समोर 3×2 आकाराचा झेंडा फक्त 30 रुपयात विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. महानगर पालिकेचे कर्मचारी झेंडा विक्री करत आहेत.तसेच पोस्ट ऑफीस मधून ऑनलाईन घरबसल्या तिरंगा झेंडा मागवू शकता.1 ऑगस्ट 2022 पासून तिरंग्याची विक्रीही सुरू झाली आहे.