Home विशेष जगात असमानता ही सगळयात मोठी व्याधी नेत्रदान हे अतिशय पवित्र कार्य –...

जगात असमानता ही सगळयात मोठी व्याधी नेत्रदान हे अतिशय पवित्र कार्य – डॉ. रमण गंगाखेडकर

अहमदनगर दि.२० सप्टेंबर

जगात असमानता ही सगळयात मोठी व्याधी आहे. गरीबी, श्रीमंती वेगवेगळी जाती धर्म व्यवस्था, जवीनशैली व साधन व्यवस्था, त्यांनी सर्वांना समान उपलब्धता ,विविध शारिरीक व्याधी आणि उपचार व्यवस्था अशा बर्‍याच गोष्टी असून जगामध्ये अंधत्व ही फारच मोठी गंभीर समस्या असून अंधत्वामुळे त्या माणसाचे वैयक्तीक, सामाजीक जीवन उध्वस्त होते आणि ही एक वैश्वीक आपत्ती असून सर्व जगात सर्वात जास्त अंध भारतात आहे व बर्‍याच अंध लोकांना नेत्रदानाची गरज असून भारतात दानाचे महत्व असून आणि हे दान मरणोत्तर करायचे असूनही फार कमी प्रमाण आहे. अहमदनगर सारख्या छोटया गावात एवढया मोठया प्रमाणात नेत्रदान होते आणि त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान होत आहे हे अतिशय समाधानकारक व प्रेरणादायी आहे. असे मनोगत पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर ह्यांनी मराठवाडा मित्र मंडळ आयोजित हैद्राबाद मुक्तीसंग्राम दिवस व राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा समारोप प्रसंगी माऊली संकुल अहमदनगर येथे केले. ह्या दिवसाचे औचित्य असल्यामुळे डॉ. रमण गंगाखेडकर ह्यांचा स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा गौरव सन्मान आदर्श गाव हिवरे बाजारचे पद्मश्री श्री पोपटराव पवारजी यांच्या शुभहस्ते अतिशय दिमाखदार सोहळयात करण्यात आला.

ह्या प्रसंगी जेष्ठ पत्रकार श्री नागनाथजी फटाले, महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. मधुसुदनजी झंवर, इंडियन मेडिकल असो.अहमदनगरचे अध्यक्ष डॉ. मिलिंद पोळ, एचओडी विखे पाटील मेडिकल कॉलेज डॉ. राजेश गायकवाड व अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version