Home राजकारण नगर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शहर जिल्हा अध्यक्षपदी इंजि. केतन क्षीरसागर यांची...

नगर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शहर जिल्हा अध्यक्षपदी इंजि. केतन क्षीरसागर यांची नियुक्ती युवकांच्या रोजगार निर्मितीसाठी लढा उभारावा – प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील

अहमदनगर दि.२० सप्टेंबर –

नगर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षपदी केतन क्षीरसागर यांना निवडीचे पत्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी आ.संग्राम जगताप, युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख,मा. आमदार दादाभाऊ कळमकर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके,शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिकराव विधाते,महिला शहर जिल्हाध्यक्ष रेश्मा ताई आठरे,कार्याध्यक्ष प्रा. अरविंद शिंदे, नगरसेवक अविनाश घुले, नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे, प्रकाश भागानगरे, अभिजीत खोसे, सुरेश बनसोडे, अंजली आव्हाड, वैभव ढाकणे, कुमार नवले, संभाजी पवार, साहेबान जहागीरदार, श्रीनिक शिंगवी, अमित खामकर, अनिल मुरकुटे, संजय सपकाळ आदी उपस्थित होते.

प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, आपल्यासमोर युवकांच्या रोजगारीचा गंभीर प्रश्न बनला आहे. लाखो विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण झाले आहे. त्यांच्या हाताला कामधंदा नाही. यासाठी युवकांचे संघटन होणे गरजेचे आहे.राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाने युवकांचे संघटन करून रोजगारासाठी लढा उभा करावा आ.संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली नगर शहरांमध्ये विकासाच्या प्रश्नाबरोबर पक्षाचे संघटन मजबूत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी एकत्रित येऊन चांगले काम करावे असे ते म्हणाले.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि.केतन क्षीरसागर म्हणाले की, मा.आ. अरुणकाका जगताप व आ.संग्राम जगताप यांच्यामुळेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली आहे. त्या संधीच्या माध्यमातून युवकांचे विविध प्रश्न मार्गी लावू शहरामध्ये युवकांचे संघटन मजबूत करू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबर रोजगार निर्मितीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करू नगर शहरामध्ये ठिकठिकाणी वाचनालय व विद्यार्थ्यांसाठी MPSC,UPSC अभ्यासासाठी वाचनालय उभारणार आहे असे ते म्हणाले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version