अहमदनगर, १८ नोव्हेंबर २०२२:
भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयीन स्तरावरील संविधान करंडक पथनाट्य स्पर्धेचे आयोजन स्नेहालय संस्थेच्या युवानिर्माण प्रकल्पाने आणि पेमराज सारडा महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाने केले आहे. येत्या २६ नोव्हेंबर रोजी अहमदनगर शहर आणि उपनगरातील विविध चौकात या पथनाट्याचे सादरीकरण होईल. त्याचा समारोप पेमराज सारडा महाविद्यालयात सायंकाळी ३ वाजता होणार आहे. संविधान करंडक केवळ विजेत्या संघाला मिळणार असून तो फिरत्या स्वरूपात राहील.
स्पर्धेतील विजेत्या संघांना अनुक्रमे ७५००, ५००० आणि ३००० रुपये तसेच प्रत्येकी २००० रुपयांची उत्तेजनार्थ ३ बक्षिसे दिली जातील. पथनाट्याचे विषय पुढील प्रमाणे –
१. भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार आणि वास्तव.
२. भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्य.
३. भारतीय संविधान आणि धर्मनिरपेक्षता.
४. भारतीय संविधान आणि महिला व बालकांचे अधिकार.
स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत.
१. प्रथम नोंदणी करणाऱ्या २० संघांना स्पर्धेत सहभागी होता येईल. नोदणी फॉर्म लिंक https://www.snehalaya.org/volunteer-youth-camp
२. किमान ७ ते कमाल १० जणांचा गट पथनाट्य करणाऱ्या संघात हवा.
३. प्रत्येक महाविद्यालयाला एकच संघ स्पर्धेसाठी पाठविता येईल.
४. स्पर्धेसाठी सहभाग शुल्क १०००/- रुपये आहे. स्नेहालय संस्थेच्या नावाने धनादेशाद्वारे आर्थिक रोख स्वरुपात हे शुल्क स्पर्धेच्या दिवशी देता (भरलेले शुल्क परत मिळणार नाही.) येईल. परंतु स्पर्धेत भाग घेण्याबाबत मात्र येत्या २० नोव्हेंबर पूर्वी युवानिर्माण प्रकल्पाला महाविद्यालयाच्या लेटरहेडवर कळवणे आवश्यक आहे. युवा निर्माण प्रकल्पाचे संपर्क पुढील प्रमाणे आहेत. मोबा.- विकास सुतार – ९०११०२६४७२ ईमेल – yuvanirman@snehalaya.org
५. आपल्या पथनाट्याचे नाव , लेखकाचे नाव, सादरीकरणासाठी लेखकाचे संमतीपत्र, कलाकारांची यादी आगाऊ कळवणे आवश्यक आहे.
६. प्रत्येक संघाला जास्तीत जास्त १० मिनिटे वेळ दिला जाईल. यापेक्षा लांबलेले पथनाट्य बाद ठरवले जाईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
७. बाहेरगावून येणारे संघाना उतरण्याची आणि भोजनाची व्यवस्था संयोजकांतर्फे स्नेहालय संस्थेत केली जाईल, परंतु याबाबत आगाऊ ४ दिवस सूचना द्यावी लागेल.
८. उत्कृष्ट पथनाट्यांचे सादरीकरण स्नेहलयाच्या रेडिओ नगर ९०.४ एफएम वरून प्रसारित करण्यात येईल.
९. प्रत्येक सहभागी कलाकाराला सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
१०. समारोपप्रसंगी विजेत्या पहिल्या तीन संघांच्या पथनाट्यांचे सादरीकरण पारितोषिक वितरणापूर्वी होणार आहे.
११. त्यासाठी सबंधित बँक खाते नंबर , पॅनकार्ड,आधार कार्ड चे झेरॉक्स घेऊन येणे प्रत्येकी २ प्रत सोबत आणाव्यात.
स्पर्धेसाठी संयोजन समिती अशी आहे: सीमा जुनी :- 9284956067 , विपुल धनगर :- 8007830024, गायत्री थोरात :- 8421803864 , प्रवीण कदम :- 8208307319