Home क्राईम आय पी एल बुकी भगत वर छापा..आता त्या २३ आयडी देणारे बुकी...

आय पी एल बुकी भगत वर छापा..आता त्या २३ आयडी देणारे बुकी आणि १६ मोबाईल बेंटिग घेणारे पोलिसांच्या रडारवर…

Oplus_131072

अहिल्यानगर दिनांक ३० एप्रिल

आय पी एल बेटिंग करणा-यावर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल रामदत्त भारती यांच्या पथकाने छापा टाकून १६,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत हकीगत अशी की कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कानेटिक चौक येथील स्वप्निल साईसुर्या परमीट रुम अॅण्ड फॅमिली रेस्टॉरन्ट येथे छापा टाकुन सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रिमीअर लीग २०२५ मध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुध्द कोलकत्ता नाईट राईडर्स याच्यात सुरु असलेल्या टी-२० सामन्याच्यावेळी सामन्यावर बॅटीग करण्याकरीता आरोपी शुभम दत्तात्रय भगत (वय ३२ रा. जे. जे. गल्ली, मंगलगेट, ता.जि. अहिल्यानगर) हा पैसे देवून त्याचे ताब्यात असलेला मोबाईल फोन वरून बेटिंग करत अअसलेला आढळून आला. आरती कडून चार मोबाईल हँडसेट दोन बनावट आधार कार्ड जप्त करण्यात आले. आहे.

तसेच क्रिकेट बेंटींग करीता २३ आयडी देणारे बुकी आणि १६ मोबाईल बेंटिग घेणारे इसम यांनी मदत केली असल्याने पोहेकों सचिन महादेव जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये भा.न्या.सं. सन २०२३ चे कलम ३१८ (४), ३३६(२), ३३६(३), ३४०(२), ३(५) सह महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा कलम ४, ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला साो. अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर डीवायएसपी अमोल भारती, पोसई दत्तात्रय शिंदे, पोहेको सुयोग सुपेकर, पोहेको/ सचिन महादेव जाधव, पोहेका किरण रमेश बनसोडे, पोना हेमंत खंडागळे, पोकॉ सागर राजेंद्र द्वारके, यांनी केली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version