Home विशेष आयपीएलचा बादशाह मोहनच्या कॉलरवर हात लावण्याची कोणाची हिम्मत नाही का आयपीएल...

आयपीएलचा बादशाह मोहनच्या कॉलरवर हात लावण्याची कोणाची हिम्मत नाही का आयपीएल सट्टेबाजी, सुगंधी सुपारी, गुटखा मटका,खुलेआम सुरू

अहमदनगर दि.२८ एप्रिल

अहमदनगर शहरातील बिंगो आयपीएल सट्टेबाजी गुटखा सुगंधी सुपारी असे अवैद्य सर्वच जे धंदे बंद करण्यासाठी सांगितले आहेत ते सर्व सर्रास सुरू असल्याचे चित्र समोर येतेय.आयपीएल सट्टेबाजी मुळे अनेक तरुणांचे जीवन उद्ध्वस्त होत आहेत मात्र या प्रश्नाकडे कोणीच गांभीर्याने पाहायला तयार नाही. अहमदनगर शहरातील अत्यंत नावाजलेल्या मोहनने या सट्टेबादीचे पाळेमुळे खोलवर रुजवलेले आहेत. मात्र मोहनच्या कॉलरपर्यंत अजूनही कोणी हात घालायला तयार नाही. मोहनचा रुबाब असेल किंवा पॉवर असेल ती एवढी वाढली की त्याच्यावर हात घालण्यासाठी कुणीच धाजवत का नाही हा आता प्रश्न समोर येतोय.

अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच खासदार सुजय विखे पाटील यांनी याबाबत पोलीस प्रशासनाला सूचना देऊन अवैद्य धंदे बंद करावेत असे सांगितले होते मात्र या सूचनांना केराची टोपली दाखवली का काय ?असंच सर्वच घडामोडींवरून दिसून येते.

एकीकडे तरुण रोज कर्जबाजारी होत आहेत अनेक सट्टेबाज गर्भ श्रीमंत होत आहेत आणि या गंभीर गोष्टीकडे कोणीच गांभीर्याने पाहत का नाही असा प्रश्न पडतोय. आयपीएल सट्टेबाजी असो अथवा बिंगो याचे केंद्र गल्लो गल्ली आहेत सर्वांना हे माहीत असल्याने मग याच्यावर कारवाई का होत नाही….का कारवाई करण्यासाठी हात बांधले गेले आहेत हेही समजायला तयार नाही.

आयपीएल सट्टेबाजी बिंगो आणि गुटखा,सुगंधी सुपारी हे धंदे सर्रास खुले सुरू आहेत मग अशा अवैध धंद्यांवर बंदी घालून उपयोग काय यासाठी हे धंदे खुलेआम सुरू करावेत की जेणेकरून चोरीछुपे काहीही होणार नाही. अनेक तरुणांचे आयुष्य बरबाद करणारे गुटखा सुगंधी सुपारी आयपीएल सट्टेबाजी यांच्या बाबत प्रशासन गांभीर्याने घेणार का?

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version