अहमदनगर दि.८ एप्रिल
आयपीएल क्रिकेट मॅच सुरू झाली असून आयपीएल क्रिकेट मॅच सुरू झाल्यापासून बेकायदेशीरपणे सामन्यांवर लागणारा सट्टाही सुरू झाला आहे. आयपीएल सट्टा आणि त्यामुळे अनेक तरुण कर्जबाजारी होतानाचे चित्र याआधी आयपीएल काळात अनेक वेळा पाहायला मिळाले आहे. अनेक तरुण कर्जबाजारी होऊन त्यांनी आत्महत्या केल्या आहेत अनेकांचे घरसंसार उध्वस्त झालेले आहेत मात्र हा आय पी एल सट्टा बंद होण्याचे नाव घेत नाही अहमदनगर सट्टेबाजी जोरात सुरू असून नगर शहरात एकूण चार मोठे बुकी आणि त्यांच्या खाली मोठी साखळी कार्यरत आहे.विशेष म्हणजे अत्यंत सहज रित्या हा सट्टेबाजार खुले आम चालू असून यावर कोणाचाही प्रतिबंध नाही.
एक ऑनलाइन ॲप आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड केल्यानंतर त्यावर खेळाडूला किती रक्कम छोटे बाजीवर खेळायचे आहे त्यासाठीचा रिचार्ज मारला की तो संपेपर्यंत ही सट्टेबाजी सुरू झाली क्रिकेटसह फुटबॉल, तीन पत्ती, तसेच अजून दोन-तीन ऑनलाईन जुगारही खेळाडू खेळू शकतो.रिचार्ज संपला तर मोठ्या बुकी कडून रिचार्ज करून घेण्याची सेवा 24 तास सुरू असते.आणि एखादा खेळाडू सट्टे बाजी मध्ये जिंकला तर जिंकलेले पैसे रोख स्वरूपात देण्यासाठी एक यंत्रणा कार्यरत असते.
तसेच या काळात बेकायदेशीर सावकारी जोरात सुरू असते हरलेल्या खेळाडूंना व्याजाने पैसे देण्यासाठी एक साखळी कार्यरत असते अगदी तासाला तसेच दिवसाला काही रक्कम व्याज घेऊन पैसे दिले जातात.मोबाईल, दुचाकी,चारचाकी,सोन,जमिनी,घर ठेऊन व्याजाने पैसे दिले जातात याची वसुली सुद्धा पठाणी पद्धतीने होते ते वेगळेच.
सट्टाखेळण्याचे मोबाईल ॲप सहजरित्या कुठेही उपलब्ध होते त्याला सांकेतिक शब्दात आय डी म्हणतात पासवर्ड आणि टाकून हे ॲप सुरू होते मात्र दरवेळी ॲपचा पासवर्ड बदलत राहतो त्यामुळे या आयडी कोण चालवतो हे कळत नाही.
अहमदनगर शहारत मोहन ,प्रवीण ,कुमार ,हे मोठे बुकी असून यांच्या खाली भलीमोठी साखळी कार्यरत आहे या साखळी द्वारे करोडो रुपयांचा सट्टा रोजच सुरू आहे आपपीएल सामना सुरू होण्यापूर्वी आणि संपेपर्यंत ही सट्टेबाजी सुरू असते.
बर हे मोठे बुकी सरेआम सर्वांच्या गळ्यात गळे घालून समाजात वावरत असतात व्हाईट कॉलर खाली सुरू असणाऱ्या या काळ्या धंद्यामुळे अनेकांच्या घरादाराची संसाराची राखरांगोळी झाली आहे अनेक तरुण देशोधडीला लागले आहेत मात्र यांच्यावर पोलिसांकडून तात्पुरती कारवाई होते मुख्य आरोपी पर्यंत कुणीही पोहोचत नाही हे न उलगडणारे कोडे आहे.(क्रमशः)
पुढील भागात – पोलीस कारवाई पासून कशी सुटका करायची याचा फंडा आयडी कसा दिला जातो