Homeजिल्हाशेवगाव तालुक्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान घराचे पत्रे उडून गेल्याने रात्रभर...

शेवगाव तालुक्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान घराचे पत्रे उडून गेल्याने रात्रभर कुटुंब उघड्यावर सत्ताधारी आमदार गायब माजी आमदार चंद्रशेखर घुले शेतकऱ्यांच्या बांधावर

advertisement

शेवगाव दि.९ एप्रिल

अहमदनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा थैमान घातले असून अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्या मध्ये पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले आहे. काढून ठेवलेला कापूस आणि गहू पावसाने ओला झल्याने त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक घरांचे पत्रे उडून गेले असून अनेक ठिकाणी मोठमोठे झाडे पडल्याने वीज खंडित झाली आहे तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने उभे असलेले पिके आडवे झालेले आहेत दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू असल्यामुळे मोठे नुकसान होऊनही शेवगाव पाथर्डीच्या भाजपच्या आमदार मोनिका राजळे या ठिकाणी फिरकल्या नाहीत मात्र राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी विविध ठिकाणी जाऊन पाहणी करत शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन दिलासा दिला या ठिकाणी शेतकऱ्यांना मदतही पोहोच केली आहे.

काही ठिकाणी घरावरचे पत्रे उडून गेल्यामुळे आणि कुटुंब रात्रभर उघड्यावर होते त्यासाठी तहसीलदारांना फोन करून ग्रामपंचायत कार्यालयात जागा द्यावी यासाठी फोनवर संपर्क करून तहसीलदारांना निर्देश दिले तर शेतकऱ्यांच्या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करून मदत मिळावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular