अहमदनगर दि.१६ एप्रिल
अहमदनगर दक्षिणचे खासदार सुजय विखे पाटील यांनी एका सभेत बोलताना अहमदनगर शहरासह जिल्ह्यात सुरू असलेल्या ऑनलाइन जुगारा बाबत भाष्य केले होते.बेकायदेशीर ऑनलाईन जुगार म्हणजेच बिंगो आणि आयपीएल क्रिकेट सामन्यांवर लावला जाणारा सट्टा यामुळे तरुण पिढी बरबाद होत असून ठराविक लोक मात्र पैशांनी गब्बर होत आहेत आणि यामुळे गब्बर झालेले लोक टोळी तयार करून गुंडगिरी करतात यातून विविध प्रकारचे व्हाईट कॉलर गुन्हे केले जातात.बेकायदेशीर सावकारी मोकळ्या जागेवर ताबे मारणे,आशा प्रकारचे काम या टोळीच्या माध्यमातुन केले जाते.
या ठराविक गब्बर लोकांच्या हाताखाली तरुण मुलांच्या टोळ्या असतात या टोळीतील तरुणांना खाऊ पिऊ घालणे गरजेनुसार पैसे पुरवणे हे गब्बर प्रमुखांचे काम असते.मात्र तरुणांना आपले भविष्य अंधारात जातेय हे लक्षात येत नाही. करण दरवर्षी नवीन मुले सावज म्हणून गब्बर प्रमुख शोधत असतात.
आता हे पोलीस यंत्रणेला माहीत नसते असे नाही सर्वकाही माहीत असते मात्र हाताची घडी तोंडाला बोट का लावले जाते हे समजायला तयार नाही. कायद्यापुढे बेकायदेशीर काम करणारे इतके मोठे झालेत का? की त्यांच्या कॉलर पर्यंत पोलिसांचे हात का जात नाही? पोलीस कारवाई होते मात्र ती छोट्या धंदा चालकांवर मात्र मोठे मशे कधीच पकडले जात नाहीत हे विशेष मोठ्या माशांचे नाव गाव धंदा सर्वांनाच माहीत असते मात्र हात पोहचू शकत नाही .
याच मोठ्या गब्बर लोकांमुळे नगरची कायद्या व्यवस्था धोक्यात अली आहे अनेक तरुण कर्जबाजारी झाले आहेत.व्यसनी झाले आहेत.भविष्य अंधारात चालले आहे.आशा लोकांवर कायदेशीर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.खा.सुजय विखे पाटील यांनी या बाबत आवाज उठवला आहे आता पोलीस प्रशासन काय कारवाई करते या कडे लक्ष आहे. जिल्ह्यातील शहरातील बिंगो आणि सट्टेबाजी करणाऱ्या लोकांची यादी पोलिसांना माहीत नसेल तर ती नावे सुद्धा जाहीर करावी लागणार आहे.आणि जर शहराचे भले होणार असेल तर सुद्धा जाहीर करावी लागणार आहे.करण आता खुद्द खासदारांनी यात लक्ष घातले असल्याने गब्बर लोकांवर कारवाई होईल ही आशा आहे.