अहमदनगर दि.६ ऑक्टोबर
वेळ दुपारी दोनची जिल्हा पोलीस मनोज पाटील हे रोजच्या कामात व्यस्त असताना येणाऱ्या नागरिकांच्या भेटी घेत होते. नागरिकांच्या तक्रारी आणि त्यांच्या समाधान करण्याचे काम सुरू असताना भेटण्यासाठी आलेल्या एका नागरिकाने थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांचा सत्कार करण्याची विनंती केली. सुरुवातीला जिल्हा पोलीस अधीक्षकांनी याबाबत नकार दिला मात्र त्या भेटण्यासाठी आलेल्या नागरिकांनी तुम्ही माझ्यासाठी देव आहात म्हणून मला तुमचा सत्कार करायचा आहे असे सांगितले.
त्याच्या कुटुंबातील मुलीला जावई त्रास देत होता मात्र पोलीस अधीक्षकांना भेटून निवेदन दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली होती त्या नंतर मात्र जावई मुली बरोबर सुखाने राहत असल्याचं त्या माणसाने पोलीस अधीक्षकांना सांगितले आणि मला करोड रुपये देऊनही जे काम झाले नसते ते तुम्ही माझ्यासारख्या गरीब माणसाचं काम केलं असल्याने मला तुमच्या सत्कार करायचा आहे अशी विनंती केली. आणि त्यांनी आणलेला फेटा जिल्हा पोलीस अधीक्षकांना घातला अचानक झालेल्या या सत्काराने पोलीस अधीक्षकही भाऊन गेले होते. कारण रोज हजारो नागरिक आपल्या तक्रारी घेऊन येत असतात त्यांच्या तक्रारीची दखलही घेतली जात असते. मात्र अशा गरीब माणसाने गावपासून शेकडा मीटर दूर असलेल्या गावात येऊन सत्कार केला. ही एक वेगळीच बाब मनाला भावून होऊन जाणारी होती.
पहा व्हिडीओ