HomeUncategorizedजामखेड येथील गाजलेल्या विशाल सुर्वे खुनप्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उमेशचंद्र यादव-पाटील...

जामखेड येथील गाजलेल्या विशाल सुर्वे खुनप्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उमेशचंद्र यादव-पाटील नियुक्त

advertisement

अहमदनगर दि.८ मे

जामखेड तालुक्यातील खर्डा येथील सुर्वे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या शेजारी असलेल्या मंदिराजवळ दिनांक 13 मे 2022 रोजी विशाल सुर्वे याचा टेम्पो अडवून अतिशय निर्घृणपणे त्याचा खून करण्यात आला होता.

या प्रकरणामुळे संपूर्ण जामखेड तालुका हादरला होता.याप्रकरणी पोलिसांनी जलद कृती करून या प्रकरणातील आरोपी कृष्णा सुर्वे, श्रीधर कान्हेरकर आणि मयताची पत्नी पूजा सुर्वे यांना अटक करण्यात आले होते.आरोपी कृष्णा आणि पूजा यांच्या अनैतिक प्रेमप्रकरणातून हा खून घडल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.

दरम्यान,या घृणास्पद खुनाची व्याप्ती लक्षात घेऊन मयताचे नातेवाईक यांनी या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून मुंबईतील ख्यातनाम वकील उमेशचंद्र यादव-पाटील यांची नेमणूक करावी अशी मागणी केली होती.या प्रकरणाची व्याप्ती पाहून महाराष्ट्राच्या गृहविभागाने आजच त्यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला.

या प्रकरणी न्यायालयाने आरोपविरुद्ध आरोप निश्चित केले असून या प्रकरणाची लवकरच नियमित सुनावणी होणार असल्याचे यादव-पाटील यांनी स्पष्ट केले.

यादव-पाटील यांच्या नियुक्तीबद्दल ग्रामस्थानीं शासनाचे आभार व्यक्त करून मयताच्या कुटुंबियांना न्याय मिळेल असा आशावाद व्यक्त केला.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular