HomeUncategorizedऑनलाईन गेममध्ये गमावले पैसे, अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या तरुणाची तलावात आत्महत्या

ऑनलाईन गेममध्ये गमावले पैसे, अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या तरुणाची तलावात आत्महत्या

advertisement

अहमदनगर दि.८ मे

छत्रपती संभाजीनगर मध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑनलाईन गेममध्ये पैसे गमवल्याने चिंतेत असलेल्या अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या तरुणाने हर्सूल तलावात उडी घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर गौरव पवार असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गौरव पवारला ऑनलाईन गेम खेळण्याची सवय जडली होती. त्यात त्याने जवळपास 50 हजार रुपये गमावल्याची नातेवाईकांमध्ये चर्चा होती. हा प्रकार समजल्यावर गमावलेले पैसे भरण्यासाठी गौरवला त्याच्या मामाने त्याला 40 हजार रुपये दिले होते. मात्र तरीही तो नेहमी तणावातच होता. आणि अखेर त्याने आत्महत्याचे टोकाचे पाऊल उचलले.


बिंगो आणि ऑनलाइन गेम सट्टेबाजी यामुळे तरुण वर्ग कर्जबाजारी होत असून शेवटी निराश होऊन तो आत्महत्येचा मार्ग स्वीकारत असल्याचे चित्र आजकाल सर्रास पाहायला मिळत आहे. अहमदनगर शहरातही गेल्या महिन्याभरात काही तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत या आत्महत्या मागचे कारण जर खोलवर जाऊन तपासल्यास यामागेही अशाच प्रकार असू शकतो तरुणांना लुटणाऱ्या टोळीमुळेच आत्महत्या केल्याचं सत्य समोर उघड केस येऊ शकत पाईपलाईन रोड भागातील एकविरा चौकातील एका तरुणाने काही दिवसापूर्वी पैशासाठी तगादा लावल्यामुळे आत्महत्या केल्याची चर्चा आहे. मात्र अनेक तरुण या ऑनलाइन गेम मुळे फसले जात आहेत त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जेणेकरून अशा सट्टेबाजाराच्या ऑनलाइन साखळी मध्ये आपला आपला मुलगा अडकू नये.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular