Homeक्राईमदेहांत शासन शिक्षा बंदी क्र. सी-१७७४४ जितेंद्र उर्फ पप्पु बाबुलाल शिंदे असा...

देहांत शासन शिक्षा बंदी क्र. सी-१७७४४ जितेंद्र उर्फ पप्पु बाबुलाल शिंदे असा झाला शेवट… नेमक काय घडल पहाटे ०५.५८ वाजता…

advertisement

अहमदनगर दि.१० सप्टेंबर
कोपर्डी प्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र ऊर्फ पप्पू बाबुलाल शिंदे याने आज पहाटेच्या सुमारास तुरुंगामधील कैद्यांसाठी वापरण्यासाठी देण्यात येणाऱ्या टॉवेलच्या साह्याने आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे पहाटे सहा वाजून तेरा मिनिटांनी जेलमध्ये डॉक्टरांनी जितेंद्र शिंदे याला मयत घोषित केले आहे.

देहांत शासन शिक्षा बंदी क्र. सी-१७७४४ जितेंद्र उर्फ पप्पु बाबुलाल शिंदे वय ३२ वर्षे हा 2017 पासून येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. कोपर्डी येथे 2016 रोजी नववी मधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी जितेंद्र शिंदे आणि त्याच्या दोन मित्रांवर आरोप ठेवण्यात आले होते अहमदनगर जिल्हा न्यायालयाने या तीनही आरोपांना फाशीची शिक्षा सोडली आहे तर सध्या या निकाला विरोधात या आरोपींनी मुंबई हायकोर्टामध्ये अपील दाखल केले होते.

आरोपी जितेंद्र उर्फ पप्पु बाबुलाल शिंदे याच्यावर मानसिक आजारावर कारागृह मनोरुग्ण तज्ञ यांक्या सल्ल्याने नियमित औषधोपचार चालु होते. पहाटेच्या सुमारास तुरुंगरक्षक निलेश प्रकाश कांबळे यांना जितेंद्र शिंदे याने फाशी घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्या क्षणी त्याने आपल्या इतर अधिकाऱ्यांना आणि सहकाऱ्यांना बोलून घेतल्यानंतर जितेंद्र याची बॉडी खाली घेतली मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तो मयत असल्याचं लक्षात आले.

या घटनेनंतर कोपर्डीच्या निर्भयाच्या कुटुंब यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की आमच्या लेकीला देवाने न्याय दिला मात्र इतर दोन आरोपींनाही आता लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी ही मागणी निर्भयाच्या कुटुंबीयांनी केली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular