HomeUncategorizedपाच वर्ष एकाच पदावर ठाण मांडून बसलेल्या जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांची तात्काळ बदली...

पाच वर्ष एकाच पदावर ठाण मांडून बसलेल्या जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करावी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांची मागणी.. नियम डावलून निधीसाठी कामांमध्ये, नावांमध्ये फेरफार करणे. असे अनेक गंभीर आरोप..

advertisement

अहमदनगर दि.११ सप्टेंबर
अहमदनगर जिल्हा प्रशासनातील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन विभागात जिल्हा नियोजन अधिकारी म्हणून निलेश भदाणे हे 2018 सालापासून या पदावर कार्यरत आहेत मात्र या पदावर इतका काळ कोणाच्या आशीर्वादाने ते कार्यभार सांभाळत आहेत हे सर्व अहमदनगर जिल्ह्याला कळून चुकले असून या पदावरून त्यांना तात्काळ बदली करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी महाराष्ट्र राज्याचे महसूल विभागाचे प्रधान सचिव यांना निवेदनाद्वारे केली आहे.


अहमदनगर जिल्हयातील जिल्हाधिकारी कार्यालयात निलेश भदाणे हे सन २०१८ पासून जिल्हा नियोजन विभागात जिल्हा नियोजन अधिकारी या पदावर कार्यरत आहेत. गेल्या पाच ते साडेपाच
वर्षांपासून शासनाने त्यांना एकाच पदावर, एकाच कार्यालयात नियुक्ती दिलेली आहे. नियमानुसार
शासनाने त्यांना अधिक काळ एका जागेवर न ठेवता इतरत्र बदली करणे अपेक्षित होते. मात्र निलेश
भदाणे हे अनेक वर्षापासून एकाच जागेवर आहेत. तसेच जिल्हा नियोजन विभागाकडून जिल्हाभरातील
लोकप्रतिनिधी, जिल्हा वार्षिक योजना आराखडा व इतर विविध निधीचे वितरण केले जाते. या कामावर
निलेश भदाणे यांचे नियंत्रण असते. नियोजन मंडळाने ज्या कामासाठी निधी मंजूर केला, त्या ऐवजी नावांमध्ये फरेफार करून निधी दिला जाण्याचे प्रकार घडत आहेत. जिल्हाधिकारी प्रशासनातील
इतर वरीष्ठ अधिकारी यांची दिशाभूल करून त्यांच्या अधिकार क्षेत्रात नसलेली मंजुरी देण्याचे प्रकार
घडत आहेत. राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने व ठराविक नेत्यांच्या फायदयासाठी हे प्रकार होत
असतांना, अनेक कामांच्या नावांमध्ये फेरफार होत असतांना निलेश भदाणे याकडे सोयीस्कर डोळेझाक करत आहेत.

अनेक वर्षापासून एकच जागेवर असल्याने या विभागात त्यांनी मक्तेदारी असल्यासारखी मनमानी सुरु केली आहे. निधी वितरणाबाबत माहिती देण्यासही ते टाळाटाळ असल्याने व त्यांनी राजकीय वरदहस्त मिळवल्याने स्थानिक अधिकारी त्यांना लगाम घालू शकत नाहीत. त्यामुळे शासनाने याची गंभीर दखल घ्यावी. नियमानुसार त्यांचा जिल्हयातील कार्यकाळ पुर्ण झालेला असल्याने त्यांची तत्काळ बदली करावी. त्यांच्या कार्यकाळात नियोजन समितीचे
झालेले ठराव, निर्णय व त्यानुसार कामांना निधीपाटप झाले का, नियोजन समितीची मान्यता न घेताच परस्पर कामांची नावे बदलली का, जिल्हा नियोजन अधिका-यांनी यावर आक्षेप का घेतले नाहीत व सर्वात महत्वाचे शासन त्यांची का बदली करत नाही, याचा खुलासा करावा व तत्काळ इतरत्र बदली करावी. अशा आशयाच्या निवेदन शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी प्रधान सचिव महसूल विभाग यांना दिले आहे.

या निवेदनाची दखल न घेतल्यास पुढील काळात जिल्हा नियोजन अधिकारी भदाणे यांच्या बदलीसाठी विविध लोकशाही मार्गाने आंदोलने केली जाणार असल्याचेही गिरीश जाधव यांनी यावेळी सांगितले.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular