अहिल्यानगर दिनांक 18 जानेवारी
अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील आजोबागड येथे अडकलेल्या 12 गिर्यारोहकांची सैन्य दल आणि स्थानिकांच्या मदतीने सुटका केली आहे मुंबई आणि नाशिक येथील 9 पुरुष आणि 3 महिला शनिवारी आजोबागड वर भ्रमंतीसाठी गेले होते. खाली उतरतांना अंधार झाल्यामुळे रास्ता दिसेनासा झाली आणि उतरता येईनासे झाले त्यामुळे ते आजोबा गडाच्या माथ्यावरच अडकले. 15 तास अडकल्यानंतर या गिर्यारोहकांनी स्थानिकांशी आणि सैन्य दलाशी संपर्क केला, यानंतर स्थानिक नागरिक वन विभाग आणि सैन्य दलाच्या दहा10 ते 12 जवानांनी त्यांना सुरक्षित खाली आणल आहे

या बाबत सविस्तर माहिती अशी की ठाणे–अहिल्यानगर–नाशिक सीमा भागातील आजोबागड डोंगरमाथ्यावर अडकलेल्या १२ गिर्यारोहकांच्या (नऊ पुरुष आणि तीन महिला) बचावासाठी १७ जानेवारी २०२६ रोजी आलेल्या एका तातडीच्या (SOS) कॉलला भारतीय लष्कराने तत्परतेने प्रतिसाद दिला. अहिल्यानगर येथील लष्करी अधिकाऱ्याने तात्काळ स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून संयुक्त बचाव मोहीम सक्रिय केली.
पोलिस आणि वन विभाग (वन्यजीव) यांच्या पथकांनी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांच्या मदतीने, या कठीण दुर्गम भागात समन्वयित बचाव आणि मदत कार्य राबवले. अचूक नियोजन, जिद्दीने केलेले मार्गक्रमण आणि विविध यंत्रणांमधील उत्तम समन्वयामुळे सर्व १२ गिर्यारोहकांना सुरक्षितपणे शोधून, त्यांना आवश्यक प्राथमिक मदत देऊन खूमशेत गावाच्या पायथ्याशी सुखरूप खाली आणण्यात आले.
!