अहमदनगर दि. १ डिसेंबर
नाशिक येथील मीना साळुंके या त्यांच्या भाचीच्या लग्नासाठी नगरमध्ये आले असताना 30 सप्टेंबर रोजी नगर – छत्रपती संभाजीनगर रोडवरील सिटी लॉन येथून मीना साळुंके यांचे पाच तोळ्याचे गंठण आणि पंचवीस हजार रुपये रोख रक्कम असलेली पर्स चोरीला गेली होती. याप्रकरणी मीना साळुंके यांनी तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरा विरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवला होता.
या गुन्ह्याचा तपास तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन
रणशेवरे, पोहेकॉ दत्तात्रय जपे, पाहेकॉ सुनिल शिरसाट, पोहेकॉ दिनेश मोरे, पोहेकॉ बाळासाहेब गिरी, पो ना दीपक जाधव, पो.ना भानुदास
खेडकर, पो ना पोना संदिप धामणे, पो ना वसीम पठाण, पो ना अहमद इनामदार पो ना अविनाश वाकचौरे, पोना सुरज वाबळे पो कॉ सचिन जगताप, पोकॉ सतीष त्रिभुवन,सतीष भवर, पोकॉ दत्तात्रय कोतकर, पोकॉ शिरीष तरटे तसेच तांत्रीक विश्लेषण करणारे पोकॉ राहुल गुंडू यांनी करून सीसीटीव्ही फुटेज तसेच लग्नातील व्हिडिओ शूटिंग तपासून ही चोरी नेवासा तालुक्यातील कुकाना येथे राहणाऱ्या
महेश आत्माराम सावंत या तेवीस वर्षीय तरुणाने केली असल्याचे निष्पन्न करण्यात पोलिसांना यश आले आहे. तोफखाना पोलिसांच्या तपास पथकाने सापळा लावून महेश सावंत याला जेरबंद केले असून
त्याने चोरलेले सोन्याच्या दागीन्यापैकी 25 ग्रॅम सोन्याचे दागीने किंमत 1,20,000/- रुपये हस्तगत करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पो ना दिपक जाधव हे करीत आहेत.