Homeराजकारणमाझ्यावर आरोप करणाऱ्यांचे कपडे सुद्धा ठेवणार नाही.. रात्री अपरात्री कोण कुठे जातो...

माझ्यावर आरोप करणाऱ्यांचे कपडे सुद्धा ठेवणार नाही.. रात्री अपरात्री कोण कुठे जातो याचे व्हिडिओ शूटिंग माझ्याकडे आहे खासदार सुजय विखे पाटील आक्रमक…

advertisement

अहमदनगर दि.१ डिसेंबर

निवडणूक लागू द्या माझ्यावर आरोप करणाऱ्यांच्या अंगावर मी कपडे सुद्धा ठेवणारा नाही..साडेचार वर्ष यांनी काय लफडे केले यांची व्हिडिओ शूटिंग देखील माझ्या कडे आहे- खासदार सुजय विखे पाटील यांचा विरोधकांवर निशाणा


अहमदनगर तालुक्यातील पोखर्डी येथे विविध खासदार निधीतून होत असलेल्या विकास कामांचा शुभारंभ भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांच्या हस्ते पार पडला यावेळी खासदार सुजय विखे यांनी आपल्या भाषणातून विरोधकांवर चांगलाच निशाणा साधला आहे.

जनतेने मला निवडून दिलं मात्र माझ्यावरती आरोप प्रत्यारोप होतात मला एकच सांगायचं आहे की आरोप करणाऱ्यांनी मागील साडेचार वर्षात काय केले उत्तर माझ्याकडे आहे आणि वेळ आल्यावर मी आरोप करणाऱ्यांचे कपडे सुद्धा ठेवणार नाही असा टोला त्यांनी विरोधकांचे नाव न घेता दिला आहे.

कोणाचं खातं कोणत्या बँक अकाउंट मध्ये आहे, कोण कुठं जातं.. कोण रात्री कधी बाहेर पडतं, कोण कोणाच्या घरी जातं माझ्याकडे सर्व व्हिडिओ शूटिंग देखील आहे आणि वेळ आल्यावर ते मी दाखवेन.

बऱ्याच लोकांना वाटत असेल की माझ्यावर टीका केल्याने मी चिडेल मात्र मी सहा महिन्यापूर्वीची तयारी सुरू केली आहे सगळ्यांच्या मागे सहा महिन्यापासूनच माझे लोक आहेत त्यामुळे एकदा निवडणुकीत मध्ये फक्त उभं राहू द्या सर्व पुराव्यानिशी जनतेसमोर आणणार असा टोला खासदार सुजय विखे पाटील यांनी विरोधकांना लगावला आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular