Homeराजकारणराज्य कबड्डी संघटनेचे उपाध्यक्ष असलेले प्राध्यापक शशिकांत गाडे यांनी कबड्डीचा शेवटचा डाव...

राज्य कबड्डी संघटनेचे उपाध्यक्ष असलेले प्राध्यापक शशिकांत गाडे यांनी कबड्डीचा शेवटचा डाव टाकला आणि निवडणुकीच्या खेळात रंगत आली..

advertisement

अहिल्यानगर दिनांक 5 नोव्हेंबर
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रा. शशिकांत गाडे यांनी नगर शहर विधानसभा मतदारसंघात आपला उमेदवारीचा अर्ज कायम ठेवत नगर शहर विधानसभा निवडणुकीमध्ये चांगलीच रंगत भरली आहे. दुरंगी लढत होत असतानाच प्राध्यापक शशिकांत गाडे यांनी आपला अर्ज कायम ठेवून या निवडणुकीत तिसरा भिडू उभा केला आहे.

कबड्डी खेळ हा तसा विचाराने खेळावा लागतो वीस मिनिटांमध्ये समोरच्या खेळाडूंना बाद करून आपल्या संघाचा विजय कसा मिळवायचा यासाठी कबड्डी खेळत असताना खेळाडू क्षणाक्षणाला समोरच्या खेळाडूला बाद करण्यासाठी प्रयत्न असतो त्याचप्रमाणे प्राध्यापक शशिकांत गाडे यांनी शेवटच्या 15 सेकंदात खेळ खेळून एक प्रकारे डाव जिंकला आहे.
निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा डाव प्राध्यापक शशिकांत गाडे यांनी जिंकला असला तरी आता त्यांना खरी लढाई पुढील पंधरा दिवसात खेळायची आहे. महाविकास आघाडी बरोबर महायुतीचे उमेदवार या दोन उमेदवारांबरोबर त्यांना टक्कर द्यायची असून यासाठी आता त्यांना वेगवेगळे डाव आखावे लागतील.

नगर शहर विधानसभा मतदारसंघासाठी अर्ज मागे घेण्यासाठी चार नोव्हेंबर हा शेवटचा दिवस होता तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याचे मुदत होती प्राध्यापक शशिकांत गाडे आपल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह वीस मिनिटे आधी निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या कार्यालयासमोर आले असताना त्यांनी वीस मिनिटांचा खेळ खेळत बरोबर शेवटच्या पंधरा सेकंदाला डाव जिंकला असेच म्हणता येईल.

नगर विधानसभेचे वारे वाहू लागल्यापासून नगर शहराची जागा महाविकास आघाडीमध्ये घटक पक्ष असलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि काँग्रेस यांच्यापैकी कोणाला मिळेल याची सर्वांनाच उत्सुकता होती जागा वाटपाच्या शेवटच्या दिवसांपर्यंत ही उत्सुकता ताणली गेली. नगर शहर हे शिवसेनेचा बालेकिल्ला असतानाही ऊ बा ठा गटाला डावलून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला ही जागा देण्यात आली त्याच दिवशी प्राध्यापक शिक्षकांकडे यांनी शिवसैनिकांची पदाधिकाऱ्यांची नगरसेवकांची बैठक घेऊन या निवडणुकीत वेगळा निर्णय घेणार असल्याची घोषणा केली ज्याप्रमाणे महाविकास आघाडीने शेवटपर्यंत नगर शहराची जागा कोणाला जाईल आणि उमेदवारी कोणाला भेटेल याबाबत गुप्तता राखली त्याप्रमाणे शशिकांत गाडे यांनीही शेवटच्या १५ सेकंदापर्यंत गुप्तता दाखवून नगर शहर पुन्हा एकदा शिवसेनेच्या ताब्यात कसे राहील यासाठी जी रणनीती आखली होती ती बरोबर चार तारखेला तीन वाजून पंधरा सेकंदाला त्यांनी जाहीर केली त्यामुळे प्राध्यापक असण्याबरोबरही राज्य संघटनेचे कबड्डीचे उपाध्यक्ष असल्याची चुणूक प्राध्यापक गाडे यांच्या या कृतीतून दिसून आली.

नगर शहरात शिवसेना जिवंत ठेवायची असेल तर गाडे यांचे बंड हे योग्य असल्याची शिवसैनिकांची प्रतिक्रिया आहे. तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आता लोकसभेच्या माध्यमातून घरोघरी पोहोचले आहे. मात्र शिवसेना नगर शहरात मागे पडत चालली होती त्यामुळे शिवसेनेला पुन्हा एकदा नवसंजीवनी देण्यासाठी प्राध्यापक गाडे यांनी मोठा डाव खेळला असून या खेळलेल्या डावात आता शिवसैनिक आणि गाडे कितपत यशस्वी ठरतात हे निकालाच्या दिवशीच कळणार आहे.

प्राध्यापक शशिकांत गाडे यांनी अजून एक गनिमी कावा करत अनिल भैय्या राठोड विचारमंच आणि शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून या निवडणुकीत उतरण्याची घोषणा केली असून तसे मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत . त्यामुळे आता महाविकास आघाडी मधील उमेदवार अभिषेक कळमकर यांना मोठी डोकेदुखी होणार आहे. कारण अभिषेक कळमकर हे सुद्धा अनिल भैय्या राठोड यांचा आशीर्वाद घेऊनच निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. तिकीट जाहीर झाल्यानंतर सर्वात प्रथम त्यांनी शिवालय येथे जाऊन स्वर्गीय अनिल भैय्या राठोड यांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली होती. त्यामुळे आता शिवसेना आणि महाविकास आघाडी मधील कार्यकर्त्यांची मोठी अडचण होणार आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular