Homeराजकारणमंगल भुजबळ यांच्या शहर विधानसभा निवडणुकीत शिट्टीचा आवाज घुमणार .. भुजबळ...

मंगल भुजबळ यांच्या शहर विधानसभा निवडणुकीत शिट्टीचा आवाज घुमणार .. भुजबळ यांचा उमेदवारी अर्ज कायम, चिन्ह मिळाले शिट्टी…

advertisement

अहिल्यानगर दि.५ नोव्हेंबर : काँग्रेसच्या मंगल भुजबळ यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवत नगर शहरातील विकासासाठी व महिलांच्या अस्तित्वासाठी तसेच ओबीसिंच्या हक्कासाठी ही लढाई लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे…

काँग्रेस पक्ष्याकडून आपल्याला उमेदवारी मागे घ्या असा कोणताही आदेश आला नसल्याने आपण निवडणुकीच्या रिंगणात राहिल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे. सध्या मंगल भुजबळ या अपक्ष उमेदवार असून त्यांचा अनुक्रमांक 12 आहे व त्यांना शिट्टी हे चिन्ह निवडणूक आयोगाने दिले असून यावेळी “शिट्टी घुमेल परिवर्तनाची” ही साद त्यांनी नगरकरांना घातली आहे.

जुनी पेन्शन योजना मिळावी, सुशिक्षित बेरोजगार यांच्या हाताला काम मिळावे, महिलांना स्वतःच्या पायावर उभ राहता येईल असा स्वयंरोजगार मिळावा.नगर शहर हे विकसित शहर म्हणून ओळखले जावे असे अनेक प्रश्न घेऊन आपण जनतेसमोर जाणार असून आपण नगर शहराची विधानसभा लढवीणारी पहिलीच महिला असल्याने व आपली लढाई ही फक्त आणि फक्त जनतेच्या हितासाठी असल्याने जनता मला नक्कीच साथ देऊन यावेळी नक्कीच परिवर्तन घडवून आणेल असा मला विश्वास असल्याचे मंगल भुजबळ यांनी म्हटले आहे…

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular