Home शहर केडगाव रेणुकादेवी मंदिरात घट स्थापना यावर्षी सुंबे कुटुंबियांना मान..

केडगाव रेणुकादेवी मंदिरात घट स्थापना यावर्षी सुंबे कुटुंबियांना मान..

अहिल्यानगर दिनांक २२ सप्टेंबर

केडगावच्य रेणुका माता मंदिरात सोमवारी विधीवत पूजा करून घटस्थापना करण्यात आली. पहिल्याच माळेला भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. नगर शहराचे श्रद्धास्थान असलेल्या केडगावच्या रेणुका माता मंदिरात नवरात्रात देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होते. नवरात्राच्या पहिल्या दिवशी सकाळी ६ ते ७ श्री सुक्त पारायण, अभिषेक करण्यात आला. त्यानंतर महापूजा होऊन सकाळी ८ वाजता विजय सुंबे व मोहिनी सुंबे यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली.

Oplus_131072

सकाळी आठ ते नऊ यावेळेत अलंकार पूजा व त्यानंतर नैवेद्य व कर्पूर आरती झाली. साडेदहा वाजता पारंपरिक आरती होऊन नवरात्राला प्रारंभ झाला, अशी माहिती पुजारी गणेश गुरव यांनी दिली. दरवर्षी वाढत जाणाºया गर्दीमुळे यावर्षीही देवीच्या स्वयंभू तांदळ्याचे दर्शन घेण्यासाठी स्त्री व पुरूष यांच्या स्वतंत्र दर्शन रांगांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मुखदर्शनाची दरवर्षीप्रमाणे व्यवस्था करण्यात आली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version