अहमदनगर दि.१३ ऑक्टोबर
अहमदनगर केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकारणात काँग्रेसचा नगरसेवक विशाल कोतकर याला पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणातील मुख्य मारेकरी संदीप गुंजाळने विशाल कोतकरच्या सांगण्यावरुन हे हत्याकांड झाल्याचं तपासात सांगितलं होतं.
आरोपी संदीप गुंजाळ, बाबासाहेब केदार, संदीप गि-हे आणि महावीर मोकळे रवी खोलम आदी आरोपी अटकेत होते.
अहमदनगरमधील शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर आणि कार्यकर्ता वसंत ठुबे यांना केडगाव येथे भरचौकात गोळ्या घालून ठार मारण्यात आलं. केडगाव येथील सुवर्णनगर येथे ही घटना घडली होती.
९ एप्रिल रोजी केडगाव येथे ही घटना घडली होती २४ एप्रिल २०१८ रोजी विशाल कोतकर याला अटक करण्यात आली होती. तेव्हापासून विशाल कोतकर हा तुरुंगात होता.
सुप्रीम कोर्टामध्ये विशाल कोतकर याचा जामीन झाला असून एडवोकेट सुधांशू चौधरी यांनी विशाल कोतकर च्या वतीने काम पाहिले होते.