Homeराजकारणजी जागा फुकट भेटते त्या जागेला लाथ मारून नागरकरांच्या कर रुपी पैशातून...

जी जागा फुकट भेटते त्या जागेला लाथ मारून नागरकरांच्या कर रुपी पैशातून 32 कोटी रुपयांची जागा घेण्याचा नगररचना विभागाचा घाट भजाप नगरसेवकाच्या नावावर असलेली जमीन घेण्याचा काही नगरसेवकांचा डाव

advertisement

अहमदनगर दि.२८ नोव्हेंबर
भाजप नगरसेविका आशाताई शिवाजी कराळे यांच्या पतीच्या नावे असणारी सर्वे नंबर 261/अ/1 ही कागदावर असणारी ४ एकरची जमीन राष्ट्रवादीच्या मध्यस्थीने संगनमत करत रु. ३२ कोटींच्या चढा नागरिकांच्या पैशातून महापालिका खरेदी करत मनपाने आजरोजी कागदावर महाघोटाळा केला आहे. यास तीव्र विरोध न झाल्यास उद्या हा कागदावरचा घोटाळा पैशांच्या बॅगा भरून राबविला जाईल. काँग्रेस हे कदापी होऊ देणार नाही, असा घाणाघात शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी “शिवनेरी” येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.

महानगरपालिकेतला आजवरचा हा जमीन खरेदीचा सर्वात मोठा महाघोटाळा आहे. अलीबाबा चाळीस चोरांची टोळी महानगरपालिका आणि नगरकरांचा जीव घेऊ पाहत आहे. खड्ड्यांमधून रोज वाट शोधणाऱ्या सामान्य लाखो नगरकरांचा जीव जाण्यापूर्वीच या महाघोटाळ्याची अंमलबजावणी कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस होऊ देणार नाही, असा इशारा काळे यांनी दिला आहे. यावेळी पत्रकार परिषदेमध्ये काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी हातामध्ये “३२ खोके, एकदम ओके” असे फलक माध्यमांसमोर झळकवत घोषणा देत पारित करण्यात आलेल्या ठरावाच्या निषेध केला.

काळे यांनी यावेळी अनेक मुद्दे उपस्थित केले ते म्हणाले की, भाजप, राष्ट्रवादी ही या शहरातील शहराच्या आयुर्वेदिक कट्ट्यावरील नेत्याच्या नेतृत्वाखाली असणारी जुनी अभद्र युती आहे. देशाचे नेते शरद पवार यांच्या आदेशाला केराची टोपी दाखवत तेव्हापासून सुरू झालेली ही युती आता आर्थिक संगनमतातून सामान्य नगरकरांची लूट करीत आहे. जे पवारांसारख्या देशातील मोठ्या नेत्यांना झुगारून लावतात ते सामान्य नगरकरांची काय तमा बाळगणार. महापालिकेतील हा जमीन खरेदी महाघोटाळा हा त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरू असून या महाघोटाळ्यात सहभागी असणाऱ्यांच्या बैठका या त्यांच्याच विशेष उपस्थिती आणि मार्गदर्शनाखाली पार पडल्याची खात्रीलायक माहिती असल्याचा आरोप काळे यांनी केला आहे.

सातबारावर सुमारे ४ एकर क्षेत्राचा उल्लेख आहे. महापालिकेने ही जागा उपलब्ध करून देण्याबाबत भाजप नगरसेविका कराळे यांना लेखी पत्र दिले असून त्यात त्यांचा गौरव केला आहे. कराळे यांनी याला लेखी उत्तर महापालिकेला दिले असून या गौरवाचा स्वीकार करत सदर जमिनीचा चांगला मोबदला मिळाला तरच जमीन देऊ, असे लेखी उत्तर दिले आहे. भाजप नगरसेवकाने जागा काही बक्षीसपत्र करून किंवा मोफत देण्याची तयारी दाखवलेली नाही. त्यामुळे त्यांचा यात गौरव कसला केला जात आहे ?  भाजप नगरसेवकाची ही जमीन महापालिकेला नियोजनपूर्वक विकण्यासाठी पूर्वीपासूनच षडयंत्र रचले गेले आहे. आयुक्तांसमवेत राष्ट्रवादीच्या नगरसेवक संपत बारस्कर यांनी स्वतः भाजपच्या कराळे यांच्या जागेची स्थळपाहणी केली असून जागा घेण्यासाठी महासभेपूर्वीपासून मनपाकडे तगादा लावला आहे.

यातील एक धक्कादायक प्रकार काळे यांनी समोर आणला आहे. मनपा आयुक्तांनी 27. 07. 2020 रोजी जागामालक शिवाजी कराळे यांना लेटर ऑफ इंटेंट दिले असून यापूर्वी याच सर्वे नंबर मधील अधिग्रहित केलेल्या सुमारे 3750.90 स्क्वेअर मीटर जागेसाठी टीडीआर सर्टिफिकेट दिलेले आहे. त्यावेळी आर्थिक मोबदला देण्यात आलेला नव्हता. यावेळी मात्र कागदावर असणारे ४ एकराचे क्षेत्र प्रत्यक्षात खरोखर ४ एकर आहे का, याची कोणतीही खातरजमा न करता थेट ३२ कोटी रुपयांचा दर वाटाघाटीची कोणतीही प्रक्रिया न राबवता कसं काय निश्चित करण्यात आला ? मुळात ही चार एकर जागा चार एकर भरतच असून ती त्यापेक्षा खूप कमी भरते, असा दावा काँग्रेसने केला आहे. भाजप नगरसेवकाने आपल्या पदाचा गैरवापर करत स्वतःची जागा स्वतः सदस्य असलेल्या सार्वजनिक संस्थेला अत्यंत चढा भावाने विकण्यास पुढे येत आपल्या पदाचा गैरवापर केला आहे. त्यामुळे त्यांचे पद रद्द करण्यासंदर्भात कायद्यात काही तरतुदी आहेत यासाठी कायदेतज्ञांचे मार्गदर्शन घेणार असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

नगररचनाकरांना निलंबित करा
मनपाचे नगररचनाकार राम चारठणकर यांनी या भ्रष्टाचाराचे षडयंत्र रचले आहे. अशा प्रकारे प्रस्ताव मांडून तो संगनमताने पारित करून घेणे हा कागदावरती सिद्ध झालेला भ्रष्टाचार आहे. त्यामुळे कायम वादग्रस्त राहिलेल्या नगररचनाकार यांचे तात्काळ निलंबन आयुक्तांनी करावे अशी आमची मागणी आहे. नगर रचनाकारांच्या विरोधात अँटी करप्शनकडे देखील काँग्रेस चौकशीची मागणी करणार आहे. आज सकाळीच आम्ही आयुक्तांची काँग्रेस शिष्टमंडळासह भेट घेतली असून महासभेने मंजूर केलेला ठराव विखंडित करावा अशी लेखी मागणी त्यांच्याकडे केली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular