अहमदनगर दि.२९ नोव्हेंबर
नगर तालुक्यातील अकोळनेर येथे शेतकरी पोपट जाधव यांनी आज सकाळी आपल्या शेतामध्ये गळाफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली वीज वितरण कंपनीने गेल्या आठ दिवसापासून वीज खंडित केल्याने पोपट जाधव यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आल्यानंतर नगर तालुक्यात एकच संतापाची लाट उसळली होती शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश कारले यांनी जोपर्यंत महावितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतल्यानंतर जवळपास दहा तासानंतरही या प्रकरणावर जिल्हाधिकारी कार्यालयातील अपर जिल्हाधिकारी मापारी
अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या दालनात पुन्हा बैठक झाल्या मात्र यावर तोडगा निघू शकला नाही.
अखेर जो पर्यंत गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत अंत्यसंस्कार होणार नाहीत आणि मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही अशी भूमिका शिवसेना उपजिह्वा प्रमुख संदेश कार्ले राष्ट्रवादीचे नेते घनश्याम शेलार जिल्हा परिषदचे माजी सदस्य बाळासाहेब हराळ आणि ग्रामस्थांनी घेतला आहे त्यामुळे आता हे प्रकरण चांगलेच चिघळत चालले असून प्रशासन यावर तोडगा काढल्या नाही तर याचे पडसाद् जिल्हाभर उमटू शकतात