Home Uncategorized क्लेरा ब्रुस जागेसंदर्भात शिवसेनेच्या शिष्टमंडळाने घेतली पोलीस अधीक्षकांची भेट क्लेरा ब्रुसची जागा...

क्लेरा ब्रुस जागेसंदर्भात शिवसेनेच्या शिष्टमंडळाने घेतली पोलीस अधीक्षकांची भेट क्लेरा ब्रुसची जागा बळकवणार्या लँड माफिया वर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी चौकशी करून योग्य ती कारवाई करू पोलीस अधीक्षकांचे आश्वासन

अहमदनगर दि.३ जून
नगर शहरांमधील क्लेरा ब्रुस हायस्कूल येथील जागा लँड माफिया आणि कब्जा ठोक गॅंग कडून बळकावण्याचा प्रयत्न सुरू असून या लँड माफियांवर मोक्काअंतर्गत कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणी साठी ख्रिश्चन समाज व शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे मागणी केली. यावेळी मराठी मिशनचे डी.जी भांबळ, शिवसेनेचे दिलीप सातपुते, संभाजी कदम, माजी महापौर अभिषेक कळमकर, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड, नगरसेवक दत्ता कावरे, सचिन जाधव, जेम्स अल्हाट, विशाल केदारी, पास्टर प्रकाश बनसोडे, राजू देठे, अजय सूर्यवंशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

शहरातील क्लेरा ब्रुस हायस्कूल या संस्थेच्या मालकीच्या मालमत्तेत दि.२८ मे रोजी रात्री १२ ते २ वाजण्याच्या सुमारास शहरातील काही लँड माफिया व कब्जा ठोक गॅंग मराठी मिशन संचलित स्कूलच्या शाळेचे गेटच्या कंपाउंड चे कुलूप तोडून अनधिकृतपणे १०० ते १५० गुंड हातात शस्त्र व लाठी काठी घेऊन मारण्याच्या हेतूने आले होते. व मिळकतीवर बळाचा व गुंडगिरीचा वापर केला. तसेच खून खराबा करण्याच्या धमक्या देऊन कब्जा मारण्याचा प्रयत्न करत होते. या ठिकाणी परिसरात अशांतता निर्माण केली. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले.

त्या रात्री क्लेरा ब्रुस हायस्कूल मैदानावर गोंधळ झाल्या नंतर तीन आयशर टेम्पो पोलिसांनी त्यामधील साहित्य सहित कोतवाली पोलिस स्टेशनला आणले होते. या गाड्या कोणाच्या होत्या तसेच कोणाच्या सांगण्यावरून या गाड्या इथे आणण्यात आल्या होत्या. याबाबतही चौकशी होऊन गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षकांनी याबाबत दोन दिवसात चौकशी करून योग्य ती कारवाई करू असे आश्वासन निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळाला दिले आहे.

वादाची पार्श्वभूमी
देशात१८१३ मध्ये अमेरिकन मराठी मिशनची स्थापना मुंबई येथे करण्यात आली. या मिशनचे कार्यक्षेत्र मुंबई, अहमदनगर, सोलापूर, सातारा, महाबळेश्वर, वाई, पुणे, वडाळा राहुरी येथे आहे. १८१३ ते १९५२ दरम्यान मराठी मिशन ही संस्था कार्यरत होती. १८१३ ते १९६४ दरम्यान देशातील सर्व मालमत्ता मराठी मिशन काही मालमत्ता अमेरिकन मिशन या नावाने होत्या. यातील काही मालमत्ता कायम भाडेकरार, तर काही मालमत्ता विकत घेतलेल्या होत्या. अमेरिकन बोर्ड ऑफ कमिशनर्स फॉर फॉरेन मिशन या नावाने खूप कमी मालमत्ता होत्या. नगरची जागा काझी यांच्या मालकीची होती. त्यांनी १८६४ मध्ये मराठी मिशनच्या व्हर्नाक्युलर एज्युकेशन सोसायटीला शैक्षणिक कामांसाठी कायमस्वरूपी मालकी हक्काच्या भाडेकराराने दिली. या जागेचा ताबा मराठी मिशनकडे आहे. काझींनी ही जागा करसेठजी अँड सन्सकडे गहाण ठेवली होती. ही कंपनी अवसायनात गेल्यानंतर तो लिलाव नगरवाला यांनी घेतला. कागदोपत्री ही जागा नगरवाला यांच्याकडे गेली. त्यानंतर काझी कुटुंबातील एका महिलेने नगरच्या न्यायालयात दावा दाखल करून १९५६ मध्ये जमीन गहाणमुक्त केली. त्यानंतर ती जमीन त्यांनी नगरमधील काही लोकांना विकली.2016 मुद्दे जागेचा ताबा घेण्यावरून या ठिकाणी चांगलाच गोंधळ झाला होता पोलीस आणि या ठिकाणी आलेल्या ख्रिश्चन समाजातील कार्यकर्त्यांची चांगलीच धुमश्चक्री उडाली होती त्यावेळी पोलिसांनी अनेक महिला आणि तरुणांवर गुन्हे दाखल केले होते. तर ही जागा त्यावेळेस तालुका दंडाधिकारी यांनी आपल्याकडे हस्तांतरीत केली असल्याची माहिती मिळते जर ही जागा तलुका दंडाधिकारी यांच्याकडे असताना या जागेवर इतर लोक येऊन ताबा कसे मिळू शकतात हा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version