अहमदनगर दि.९ डिसेंबर
अहमदनगर शहरातील नव्याने झालेल्या कोहिनूर मॉल समोर दोन गटात तुफान राडा झाला असून. दोन गटातील तरुणांमध्ये चांगलीच गुद्दा गुद्दि झाली आहे भर रस्त्यात झालेल्या या गुद्दा गुद्दी मुळे काही काळ वाहतूक खोळंबली होती तर येणाऱ्या जाणाऱ्या बघ्यांमुळे तर मार्ग जाम झाला होता.
तोफखाना पोलिसांना ही माहिती कळताच पोलिसांनी तातडीने कोहिनूर मॉल समोर धाव घेऊन परिस्थिती आटोक्यात आणली. मात्र पोलीस आल्यानंतरही तरुणांमध्ये धुसमुस चालू होती त्यामुळे हे प्रकरण पुढे वाढू होऊ शकते अशी शक्यता असून पोलिसांना आता हा वाद वाढू नये खबरदारी घेणे गरजेचे आहे.