अहमदनगर दि.१० डिसेंबर
अहमदनगर शहरात तोफखाना पोलिसांनी तोफखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत कारवाई करून पाच कॅफे शॉप च्या नावाखाली सुरू असलेल्या अवैध धंद्याचा फरदाफाश केला या कारवाईचे नगर शहरातील नागरिकांनी स्वागत केले आहे विशेष म्हणजे ज्या ठिकाणी हे कॅफे चालत होते त्या आसपास राहणाऱ्या नागरिकांनी पोलिसांच्या या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले आहे. अशा कॅफेवर कारवाई झाल्यामुळे पुन्हा चुकीचे चित्र पाहायला मिळणार नाही अशी अपेक्षा नागरिकांना होती मात्र दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच चित्र नागरिकांना पाहायला मिळालं. त्यामुळे पोलिसांची ही कारवाई फक्त जूजाबी असल्याचं दिसून येत असून फक्त गुन्हे दाखल करून उपयोग नाही तर अंतर्गत जी बसण्याची आणि अश्लील चाळे करण्याची रचना केली आहे ते उध्वस्त होणे गरजेचे आहे तरच अशा चुकीच्या कामांवर चाप बसू शकतो.
कॅफेच्या नावाखाली अंतर्गत रचना बदलून सोफे आणि पडदे लावून आत मध्ये काय चालते हे पोलिसांनीही पाहिलं आणि त्याप्रमाणे गुन्हेही दाखल केले मग ही कॉफे हाउस मधील अंतर्गत रचना बदलली नाही तर पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच तिकिटावर तोच खेळ पुन्हा सुरू होईल त्यामुळे अंतर्गत रचना उद्ध्वस्त झाल्याशिवाय असे अश्लील चाळे थांबणार नाही आणि येणारी पिढी बरबाद होण्यापासून वाचवायची असेल तर असे चुकीचे कॅफे हाऊस उध्वस्त करणे गरजेचे आहे.
शुक्रवारी पोलिसांनी केलेल्या कारवाईत अजून एक धक्कादायक प्रकार समोर आला असून सावेडी उपनगरातील गुलमोहर रोड परिसरातील एका कॅफे हाऊसवर पोलिसांनी कारवाई केली मात्र त्या ठिकाणी मालक चालक यांच्यावर कारवाई न करता त्या कॅफे समोर असलेल्या एका हातगाडी चालवणाऱ्या तरुणाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आणि मालक चालक मोकळा राहिला आणि पुन्हा दुसऱ्याच दिवशी पोलिसांच्या नाकावर टिचून त्याने पुन्हा तोच प्रकार सुरू केला आहे अशी चर्चा त्या परिसरात सुरू असून यामुळे पोलिसांच्या या चांगल्या कारवाईवर संशय व्यक्त होऊ लागला आहे.
जर ह्या गोष्टी बंद होत नसेल तर मग अशा कॉफी चालकांना लॉज ची परवानगी देऊन खुल्या त्यांना तो व्यवसाय करण्याची मुभा का देऊ नये असा संत तसा वाढता नागरिक करू लागले आहेत उच्चभूमी परिसरामध्ये असे प्रकार होत असल्याने नागरिकांनाही याचा त्रास होतो त्यामुळे अशा कॅफेचे समोर उच्चाटन होणे गरजेचे आहे.