अहमदनगर दि.१९ ऑगस्ट
अहमदनगर शहरातील गुजर गल्ली भागामधील एका महिलेने अहमदनगर शहरातील शिवसेनेचे युवा नेते विक्रम राठोड यांच्याविरुद्ध जमिनीच्या वादावरून त्रास देत असल्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये तक्रार अर्ज दिला होता मात्र याप्रकरणी जेव्हा हा अर्ज कोतवाली पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आला त्यावेळी अर्जदार महिलेसह युवा नेते विक्रम राठोड यांना पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. यावेळी तक्रार महिला आणि विक्रम राठोड यांना जेव्हा समोरासमोर बोलण्यात आले तेव्हा विक्रम राठोड यांनी त्या ठिकाणी तक्रारदार महिलेस या आधी कधीही पाहिले नव्हते व त्या महिलेने आपण यांना कधीही पाहिले नसल्याचं सांगितलं तसेच ज्या जागेबाबत तक्रार आहे ती जागा विक्रम राठोड यांच्या वडिलोपार्जित असून ज्या जागे बाबत तक्रार आहे ती जागा मोजून कायदेशीरपणे जागा देवाण-घेवाण केली जाईल अशी दोन्ही बाजूंनी संमत्ती झाल्याने हा तक्रार अर्ज निकाली काढण्यात आला होता अशी माहिती युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड यांनी आवाज महाराष्ट्राशी बोलताना दिली आहे. कारण याबाबत बातमी आवाज महाराष्ट्राचा वेब पोर्टल द्वारे प्रसारित केल्यानंतर युवा नेते विक्रम राठोड यांनी हा खुलासा केला आहे.
मात्र 11 ऑगस्टला महिलेने दिलेला अर्ज आज निकाली काढल्यानंतरही ज्या बातम्या आल्या आहेत त्या बाबत विक्रम राठोड यांनी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधला आहे स्वर्गीय अनिल राठोड यांची शिकवण घेऊन आणि त्यांनी नगर मधील नागरिकांबरोबर तयार केलेला विश्वास पुढे नेण्यासाठी सर्वसामान्य जनतेसाठी काम करत असताना असे चुकीचे आरोप होत असून या आरोपांना न डगमगता पुढे काम करत राहणार असल्याचेही विक्रम राठोड यांनी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधताना सांगितले आहे. तसेच या तक्रार अर्ज बाबत लवकरच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून पत्रकार परिषद घेऊन सविस्तर खुलासा करणार असल्याचेही विक्रम राठोड यांनी यावेळी सांगितले.