अहमदनगर दि.8 डिसेंबर
सहा डिसेंबर रोजी ओंकार नामक तरुणाने आपल्या व्हाट्सअप डीपीवर राम मंदिर आणि बाबरी मस्जिद बाबत स्टेटस ठेवल्याने याचा राग येऊन मुस्लिम धर्मिया तरुणाने त्यास फोनवरून आक्षेपार्ह विधान केले होते. यावरून अशा टॉकीज चौक आणि बारातोटी कारंजा परिसरात चांगलाच तणाव निर्माण झाला होता.
पोलिसांना ही माहिती कळतात कोतवाली पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या परिसरात पेट्रोलिंग सुरू केल होत. ही पेट्रोलिंग सुरू असतानाच्या दरम्यान कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी अभय रामचंद्र कदम यांना तख्ती दरवाजा येथे साहिल गुलाम दस्तगीर,मोहसीन रफिक शेख, जमील नवाज बेग, सय्यद आवेज जाकीर ऊर्फ बोबो, सय्यद परवेज जाकीर व इतर ७ ते ८ तरूण मुले हे हातामध्ये दंडुके, लोखंडी रॉड हातात घेवुन तख्ती दरवाजा येथे फिरतांना आढळून आल्याने अभय कदम यांच्या फिर्यादी वरून कोतोवाली पोलीस ठाण्यात या सर्व तरुणांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१) चे उल्लंघन १३५ अन्वये फिर्याद नोंदविण्यात