Homeराज्यअहमदनगर शहरात रंगणार 20 ते 23 एप्रिलला छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेचा...

अहमदनगर शहरात रंगणार 20 ते 23 एप्रिलला छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार; 10 महाराष्ट्र केसरीसह अनेक नामवंत मल्ल या स्पर्धेत होणार सहभागी ; भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि अहमदनगर जिल्हा तालीम संघाचे आयोजन

advertisement

अहमदनगर दि.१६ एप्रिल

अहमदनगर शहरासह जिल्हाला कुस्तीची वैभवशाली परंपरा लाभली असून नगर शहरातील नामवंत मल्ल कै. छबुराव लांडगे ( कला चिता) यांचे नाव आजही देशभरात नामांत मल्लां मध्ये घेतले जाते. तेव्हापासून सुरू झालेली कुस्तीची परंपरा आजही सुरू आहे. कुस्तीला गतवैभव पुन्हा प्राप्त मिळून देण्यासाठी आणि कुस्तीला सोनेरी दिवस यावेत यासाठी नगर शहरातील भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि अहमदनगर जिल्हा तालीम संघाच्या वतीने राज्यातील सर्वात मोठ्या छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन 20 ते 23 एप्रिल दरम्यान अहमदनगर शहरातील वाडिया पार्क मैदानावर करण्यात आले आहे.

या ठिकाणी जंगी कुस्त्यांचा थरार रंगणार आहे.पारंपारिक लाल मातीच्या आखाड्यावर आणि मॅटवर या दोन्ही प्रकारात कुस्त्या नगरकरांना पाहायला मिळणार आहेत. यासाठी वाडीयापार्क मैदानावर एक मातीचा आखाडा तर दोन गादीचे आखाडे तयार करण्यास सुरुवात झाली आहे. नगरकरांसह राज्यातील कुस्ती शौकिनांना दिग्गज मल्लांच्या कुस्त्या पाहण्यास मिळणार आहेत.

या स्पर्धेतील विजेत्या मल्लास भारतात आणि कुस्तीच्या इतिहासात प्रथमच अर्धा किलो सोन्याची गदा त्याची किंमत सुमारे 35 लाख रुपये आहे ही गदा विजेत्या मल्लास देण्यात येणार आहे. तसेच दुसरा क्रमांक पटकावणाऱ्या मल्लास दोन लाख रुपये तर तिसरे क्रमांक पटकावणाऱ्या मल्लास एक लाख रुपये आणि प्रत्येक गटातील प्रथम विजेत्यास एक लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. भारताच्या इतिहासात प्रथमच एवढे मोठे बक्षीस ठेवण्यात आले आहे.

या कुस्तीच्या शुभारंभास भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार बबनराव पाचपुते, आमदार मोनिका राजळे, अर्जुन वीर पुरस्कार विजेते पैलवान काका पवार ,महाराष्ट्र केसरी गुलाबराव बर्डे, पै अशोक गोडवे ,यांच्या उपस्थितीत शुभारंभ होणार आहे. या स्पर्धेचे स्वागत अध्यक्ष माजी मंत्री आमदार राम शिंदे हे आहेत. शुभारंभाच्या आधी सर्व मल्लांची नगर शहरातून उंट घोड्यांवरून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येणार आहे.

तर तीन दिवस चालणाऱ्या या कुस्तीच्या समारोपला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबरोबर मंत्रिमंडळातील अनेक मंत्री नेतेगण उपस्थित राहणार असल्याची माहिती अहमदनगर शहरामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी तसेच अहमदनगर जिल्हा तालीम संघटनेचे अध्यक्ष वैभव लांडगे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, भाजपचे जेष्ठ नेते अभय आगरकर, प्राध्यापक भानुदास बेरड ,भाजपच्या ज्येष्ठ नेते वसंत लोढा, प्रशांत मुथा ,शिवसेनेचे संपर्कप्रमुख सचिन जाधव यांनी ही माहिती दिली आहे.

कुस्ती स्पर्धेत नऊ गट असून 48 किलो 58 किलो 65 किलो 70 किलो 74 किलो 79 किलो आणि 86 ते 135 हा खुला गट सुद्धा असणार आहे सोन्याची गदा ही 86 ते 135 गटामध्ये होणाऱ्या कुस्ती मधील विजेत्याला मिळणार आहे

अर्धा किलो सोन्याची गदा बनवण्यासाठी डिझाईन हे राजस्थान मधून बनवून आणले असून ही गदा नगर शहरामध्ये तयार केली जात आहे. तसेच ही गदा सोन्याची असल्यामुळे विजेत्याला या सोन्याच्या गदे बरोबर जीएसटी सहित हॉलमार्क असलेले प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याची माहिती वैभव लांडगे आणि सुवेंद्र गांधी यांनी दिली आहे.

कुस्तीमध्ये सहभागी होणारे मल्ल हे शेतकऱ्यांची मुले असल्याने शेतकऱ्यांच्या मुलांनाही मोठमोठी बक्षीस मिळावेत यासाठी माजी नगरसेवक सुरेंद्र गांधी यांनी मोठे प्रयत्न केले आणि अहमदनगर जिल्ह्यात आणि भारतात प्रथमच एवढ्या मोठ्या बक्षिसांची लायलूट असणारी कुस्ती स्पर्धा होत आहे या स्पर्धेला अहमदनगर जिल्ह्यासह राज्यातील  कुस्तीप्रेमींनी उपस्थिती लावावी असं आवाहन सुवेंद्र गांधी, वैभव लांडगे, अनिल शिंदे, दिलीप सातपुते ,वसंत लोढा ,अभय आगरकर ,सचिन जाधव यांनी केले आहे.

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular