अहिल्यानगर दिनांक 28 सप्टेंबर
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर हल्ला केल्याप्रकरणी नगर तालुका पोलिसांनी गोरख दळवी , गणेश होळकर ,संभाजी सप्रे या तिघांवर गुन्हा दाखल केला होता. आज या तिघांनाही जिल्हा न्यायालयात हजर केले असता. न्यायाधीश डी के पाटील यांनी तीनही आरोपींना एक दिवसाची पोलीस कस्टडी सुनवली आहे.

गोरख दळवी , गणेश होळकर ,संभाजी सप्रे यांच्या वतीने अँडव्होकेट महेश तवले , संजय वालेकर ,अनुराधा येवले,सतीश गिते, सचिन तरटे, योगेश नेमाने ,स्वाती जाधव, यांनी काम पाहिले.