अहमदनगर दि २४ फेब्रुवारी
अहमदनगर शहराच्या बाजूला असलेल्या केडगाव उपनगरात अंबिका नगर भागात आज सकाळी एक बिबट्याने दर्शन दिल्याने एकच खळबळ उडाली होती. प्रत्यक्षदर्शी नागरिकांच्या मते हा बिबट्या सकाळी दहा ते साडे दहाच्या सुमारास दिसला होता. बिबट्याने थेट केडगाव शहराच्या मध्यवर्ती भागात दर्शन दिल्याने या भागातील नागरिक चांगलेच घाबरले होते. बिबट्याने घाबरून जाऊन दोन-तीन नागरीकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला यामध्ये तीन जण जखमी झाले होते.
बिबट्या केडगाव मध्ये आल्याची माहिती कळताच
शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अमोल भारती
कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी आपल्या फौज फट्यासह केडगाव परिसरात धाव घेतली ज्या ठिकाणी बिबट्याने आसरा घेतला त्या ठिकाणी जाऊन पोलिस बंदोबस्त ठेवला होता नागरिकांना घराबाहेर पडू नये म्हणून सूचनाही केल्या.
सकाळी बारा वाजेच्या दरम्यान पासून ते साडेचार पर्यंत बिबट्याला पकडण्याची कारवाई सुरू होती मात्र बिबट्याला पकडण्यासाठी नगर शहरात वन विभागाची रेस्क्यू टीम नसल्याने संगमनेर येथून रेस्क्यू टीमला बोलवण्यात आले होते त्यामुळे ही टीम येण्यास बराच उशीर झाला तर त्याआधी नगर शहरातील सर्पमित्र आणि प्राणी मित्रांच्या एका टीमने बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न केले मात्र ते प्रयत्न असफल ठरले.
यादरम्यान मात्र नागरिकांनी केलेल्या आरडाओरडीमुळे बिबट्या एका घराच्या आवारातून दुसऱ्या घराच्या आवारात उड्या मारत असल्यामुळे नागरिकांची पळापळ आणि आरडाओरड सुरू होती. बिबट्याला पकडण्याऐवजी बघ्यांची गर्दी सांभाळण्यातच पोलिसांची तारेवरची कसरत करावी लागली.तर वन विभागाचे कर्मचारी लेट येऊन हातात फक्त काठ्या घेऊन आले ही एक विशेष गोष्ट म्हणता येईल. वन विभागाचे अधिकारी कर्मचारी येऊनही काहीच करत नसल्यामुळे आणि काही तरुणांच्या हुल्लड बाजी मुळे परिसरात अरडा ओरड सुरू होता यामुळे बिबट्याने गच्चीवर बसलेल्या एका नागरिक वर हल्ला केला त्यामुळे केडगाव मधील माजी नगरसेवक मनोज कोतकर, माजी नगरसेवक अमोल येवले आणि संग्राम कोतकर यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते.
अखेर तीन वाजेच्या दरम्यान संगमनेरहून आलेल्या टीमने बिबट्याला बेशुद्ध करण्याच्या साठी रणरीती आखली आणि बिबट्या ज्या ठिकाणी आडोशाला बसून होता त्या ठिकाणची पाहणी करून रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात केली. अखेर बिबट्याला बेशुद्ध करण्याचे इंजेक्शन बंदुकीद्वारे मारल्याने बिबट्या त्यानंतर जवळपास वीस मिनिटानंतर ग्लानी येऊन एका झाडाच्या आडोशाला जाऊन बसला होता तिथे त्याला दुसरे भुलीचे इंजेक्शन दिल्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जाळी टाकून त्यास पकडले आणि लोखंडी पिंजरा टाकून त्याची रवानगी वन विभागाच्या परिसरात केली.
रेस्क्यू ऑपरेशनच्या वेळी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी रवी टकले आणि दीपक रोहकले यांनी मोठे सहकार्य केले त्यामुळे केडगाव ग्रामस्थांच्या वतीने वन विभागाचे अधिकारी सुवर्ण माने यांच्यासह कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे आणि रवी टकले यांचा सन्मान दिलीप सातपुते आणि मनोज कोतकर यांच्या हस्ते करण्यात आला.
या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये उपवन संरक्षण अधिकारी सुवर्ण माने, गणेश मिसाळ, एस आर राठोड, वाघुळकर, एस एस शहाणे, डॉक्टर अक्षय दाहातोंडे, नितीन गायकवाड राजश्री राऊत यांच्यासह वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.