अहमदनगर दि.२८ एप्रिल
अहमदनगर जिल्हा पोलिस दलातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या आस्थापनेवर दोन पोलिस
निरीक्षक पदे मंजूर असल्याने उत्तर नगर जिल्ह्यासाठी स्वतंत्र पोलिस निरीक्षक नियुक्त केला जावा,
अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखरपाटील यांच्याकडे केली आहे.
दरम्यान, सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या पोलिस बदल्यांमध्ये वर्षानुवर्षे एकाच पोलिस ठाण्यात
असलेल्या पोलिसांच्या प्राधान्याने बदल्या केल्या जाव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे. शकिर शेख यांनी याबाबत शेखर यांना पत्र पाठवले आहे. त्यात
त्यांनी म्हटले आहे की, नगरचे पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी नुकतेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षकपदी दिनेश आहेर यांची नेमणूक केलेली आहे. मात्र, आस्थापनावर पोलिस निरीक्षक २ पदे मंजूर
आहे.
अहमदनगर जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या मोठा जिल्हा
आहे. या जिल्ह्यामध्ये एकूण १४ तालुके असून ७ महसूल विभाग आहेत. या सगळ्या गोष्टींचा विचार करुन दोन पोलिस निरीक्षक पदे मंजूर असताना एकाच पोलिस
अधिकाऱ्याची नेमणूक केलेली आहे. त्यामुळे एक अधिकारी संपूर्ण जिल्हयाकरिता पुरेसा नाही. दोन निरीक्षकाची नेमणूक केल्यास गुन्हयाची जलदगतीने
निर्गती होण्यास मदत होऊ शकते. तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या आस्थापना सूचीवर नमूद पदांऐवजी जादा अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचाही दावा शेख यांनी केला आहे.