अहमदनगर दि.२८ एप्रिल
अहमदनगर शहरामधील प्रोफेसर कॉलनी चौकामध्ये छत्रपती संभाजी महाराज स्मारक उभारणी साठी छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले असून अनेक वर्षांपासून प्रोफेसर कॉलनी चौकात छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्ण कृती पुतळा बसवण्याची मागणी होत आहे यासाठी सर्व प्रशासकीय कार्यालयाकडून ना हरकत दाखले ही भेटलेले आहेत.मात्र महानगरपालिकेकडून हे स्मारक उभारणी साठी दिरंगाई होत असल्याने अखेर कृती समितीच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे जोपर्यंत या कामाचे भूमिपूजन होणार नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरू राहणार असल्याचं छत्रपती संभाजी महाराज कृती सामीतिच्या वतीने सांगण्यात आले आहे.