Homeक्राईमदेख कल गोली नही चलाई, अगली बार सिधे ठोक देंगे,.... म्हणत व्यापाऱ्यास...

देख कल गोली नही चलाई, अगली बार सिधे ठोक देंगे,…. म्हणत व्यापाऱ्यास धमकी देणाऱ्या दोन जणांच्या स्थानिक गुन्हे आवळल्या मुसक्या…..

advertisement

अहिल्यानगर दिनांक 19 डिसेंबर
नगर शहरातील एका व्यापाऱ्यास पाठलाग करून त्यास धमकी देणाऱ्या आणि त्यानंतर मोबाईलवर कॉल करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या विरोधात किरण मोहनलाल राका यांनी तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला होता रांका यांच्या फिर्यादी नुसार बीएनएस कलम 126 (2), 351 (2) (3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा तपास तोफखाना पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेने करावा असा आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश यांनी दिला होता. या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई तुषार धाकराव व पोलीस अंमलदार संदीप पवार, संतोष खैरे, सागर ससाणे, रविंद्र घुंगासे, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड व महादेव भांड या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक स्थापन करून गुन्ह्याचा तपास सुरू केला होता.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तसेच मोबाईलच्या लोकेशन नुसार तपास सुरू केला त्यानुसार या पथकाला या गुन्ह्यातील काही आरोपी रामवाडी येथील तारकपूर रोड कडे जाणाऱ्या रस्त्यावर उभे असल्याची माहिती मिळाली त्यानुसार या पथकाने सापळा लावून अजय अरूण साळवे, वय 42, रा.माधवबाग, आलमगीर, भिंगार आणि पवन प्रमोद उघडे, वय 24, रा.घर नं.79, सदरबाजार, भिंगार, अहिल्यानगर या दोघांना ताब्यात घेतले या दोघांकडून अधिक माहिती घेतली असता अजय अरूण साळवे याने खोटया कागदपत्रांचा वापर करून दिपक राजु भुजबळ, रा.घासगल्ली, कोठला, अहिल्यानगर याचे विजय अरूण नवगिरे, रा.कल्याण रोड, शिवाजीनगर या नावाने बनावट कागदपत्राच्या आधारकार्ड तयार केले. त्या बनावट आधारकार्डच्या आधारे वेगवेगळी कागदपत्रे तयार केली. आरोपी अजय साळवे याने व्यापारी किरण राका यांचेकडून खंडणी वसुल करण्याचे उद्देशाने त्यांना फोन करून धमकी दिली तसेच व्यापाराच्या मागे जाऊन त्याला खंडणीसाठी दम दिल्याची ही माहिती समोर आली.

या दोन्ही आरोपींच्या ताब्यातून 82,000/- रू किंमतीचा मुद्देमाल त्यात एक ग्रे कलरची ॲक्टीव्हा, नोकीया व जिओ कंपनीचे मोबाईल, विजय अरूण नवगिरे याचे आधारकार्ड पॅनकार्ड व बॅक पासबुक, एक रबरी स्टॅम्प, अनोळखी इसमाचे फोटो असा मुद्देमाल जप्त केलेला आहे.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, आपण पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, शहर उपविभागीय अधिकारी अमोल भारती, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular