Homeशहर"तो" बीफ माफिया पकडा सर्व अवैद्य कत्तलखाने बंद होतील... हिंदू समजासाठी देवासमान...

“तो” बीफ माफिया पकडा सर्व अवैद्य कत्तलखाने बंद होतील… हिंदू समजासाठी देवासमान असणाऱ्या गाईंची निर्घृण कत्तल हा प्रत्येक हिंदूंवर होणारा आघात.. याविरुद्ध हिंदुत्ववादी संघटना नव्हे प्रत्येक हिंदूंनी रस्त्यावर उतरण्याची गरज…

advertisement

अहिल्यानगर दिं.१९ डिसेंबर :
अहिल्यानगर जिल्ह्यातून गोमातांची तस्करी होण्याचे प्रमाण वाढले आहे. राज्य सरकारने गायींना गोमातेचा दर्जा दिला आहे. त्यामुळे पोलिसांनी गोतस्करांवर कठोर कारवाई करावी. या घटनेच्या मुळापर्यंत पोचून मुख्य सुत्रधारांना शोधून काढावे. गोतस्करीचे रॅकेट उध्वस्थ करावे. अशी मागणी बजरंग दल आणि हिंदू जनसेवक आमदार संग्राम जगताप यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन देऊन केली आहे.

आज पर्यंत पोलिसांनी कत्तलखान्यांवर छापे मारून मोठ्या प्रमाणात कारवाई केल्या आहेत मात्र तरीही कत्तलखाने बंद होत नाही हे विशेष त्यामुळे अशा लोकांना नेमकं अभय कोण देत हाही प्रश्न समोर येत आहे सध्या स्थानिक गुन्हे शाखेने जिल्हाभरात अवैध गोमांस तस्करी करणाऱ्या कत्तलखान्यांवर छापे टाकण्यावर भर दिला आहे अनेक टन गोमांस पकडले गेले आहे.

अनेक वेळा गाय अथवा त्यांचे छोटे छोटे पिल्लं यांचे तोंड बांधून हे तस्कर लांब प्रवास करत असतात असेही प्रकार अनेक वेळा उघडकीस आले आहेत. मात्र गोमाऊस तस्करी आणि गोमातेची तस्करी कोणी करू नये म्हणून अशा अवैध कत्तलखानांवर कारवाई करताना मालकांवर हद्दपारीची अथवा एम पी ए डी सारखी कठोर कारवाई करावी अशी मागणी आता समोर येत आहे.

गोमातेची विक्री करणाऱ्या, वाहतूक करणाऱ्या, खरेदी
करणाऱ्या दलालांवर जशी कारवाई केली तर गो तस्करी थांबण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे आपले
गोधन या कसायांच्या हाती देणाऱ्या गोमातेच्या मालकांना सुद्धा त्याच पद्धतीने समज देण्याची शिकवण देण्याची गरज आहे.

जनावरांची ने आण करण्यासाठी अनेक कसाई जनावरांना गुंगीचे औषध घालून बेशुध्द करतात अथवा त्यांच्या तोंडाला चिकटपट्टी बांधून त्यांचे तोंड बंद करतात अशा अमानुष प्रकारांना आळा घालण्यासाठी आता थेट जे गोमांस माफीया आहेत त्यांच्यावरच घाला घालण्याची वेळ आता आली आहे. आता फक्त हिंदुत्ववादी संघटनांनी नव्हे तर प्रत्येक हिंदूने रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. गाई हे हिंदू समाजाचे दैवत आहे याच दैवताला कसाई लोक निर्घृणपणे मारतात आणि ते मांस खातात या अत्यंत राक्षसी वृत्तीचा प्रकार असून या राक्षसी वृत्तीला आता संपवण्यासाठी प्रत्येकाने रस्त्यावर उतरणे गरजेचे आहे.

नगर शहरात अनेक जण बिफ विक्रीचा व्यवसाय करतात मात्र यांचा मोर्चा एक राजकीय वलय असलेला नेता असून या नेत्यालाच पोलिसांनी पकडण्याची गरज आहे. राजकीय वलय पांघरून हा आपला दीप व्यवसाय अत्यंत गोडी गोडी मध्ये सुरू ठेवतो एकीकडे सामाजिक काम करण्याचे नाटक करत असताना हिंदू समाजाच्या देव समजणाऱ्या जाणाऱ्या गाईची तस्करी हा करतो हाच बीफ आणि अवैद्य गुटखा तस्करीचा माफिया असून या बीफ माफियावर हद्दपारी अथवा कायमस्वरूपी जेलमध्ये टाकण्याची कारवाई होण्याची गरज आहे. तरच नगर शहरातील अवैध्य कत्तलखाने आणि गाईंच्या कत्तली थांबतील. त्यामुळे आता पोलिसांनी कोणताही मागचा पुढचा विचार न करता अशा बिफ माफियांवर कायद्यानुसार कडक कारवाई करावी अशी मागणी आता हिंदुत्ववादी संघटना आणि हिंदू समाजाच्या वतीने करण्यात येत आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular