Home Uncategorized कॅफे आणि लॉज कमी होते म्हणून आता सलून अँड स्पा मध्ये अश्लील...

कॅफे आणि लॉज कमी होते म्हणून आता सलून अँड स्पा मध्ये अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध…

अहमदनगर दिनांक 29 जुलै
अहमदनगर शहरात लॉज आणि कॅफे चा उपयोग सरासपणे शालेय विद्यार्थी आणि कॉलेज तरुण करत असल्याचे चित्र रोजच पाहायला मिळत आहे. नगर शहर न मोठ पर्यटन स्थळ आहे ना मोठी इंडस्ट्री आहे. मग अहमदनगर शहरात एवढे लॉज चालतात कसतर याचे उत्तर म्हणजे अश्लील चाळे करण्यासाठी लॉज उपलब्ध करून दिले जातात या ठिकाणी सर्रासपणे कॉलेज मधील तरुण-तरुणी आणि शाळेतील विद्यार्थी ये जा करताना चित्र नगर शहरात पाहायला मिळते.

कॅफे आणि लॉज कमी होते का काय म्हणून आता सलून अँड स्पा च्या नावाखाली पुरुष व महिलांना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांच्या छाप्यानंतर समोर आला आहे.

सावेडी उपनगरातील पाईपलाइन रस्त्यावरील श्रध्दा एनक्लेव्ह नावाच्या इमारतीत निर्वाना फॅमिली सलून ऍण्ड स्पा नावाचे सलूनमध्ये पुरुष व महिलांना अश्लिल चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिल्याचा प्रकार पोलिसांच्या छाप्यातून समोर आला आहे. या सलूनचा मालक राहुल बागल याच्याविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

खासदार निलेश लंके यांच्या उपोषणानंतर आता पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून अवैध धंद्यांवर सध्या विविध ठिकाणी छापे टाकले जात आहेत मात्र या छाप्या दरम्यान आता अनेक धक्कादायक प्रकार समोर येत असून सलून आणि स्पा च्या नावाखाली अश्लील चाळे करण्याचा प्रकारही समोर आला आहे. त्यामुळे अश्लील चाळे करण्यासाठी आता ही जागा राहिली होती का काय अशीच चर्चा सध्या नगर शहरात सुरू आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version