Home शहर मॅडम चा फोन वाजतो आणि समोरच्याला धडकीच भरते .. अनेक लोक आत्महत्येचा...

मॅडम चा फोन वाजतो आणि समोरच्याला धडकीच भरते .. अनेक लोक आत्महत्येचा मानसिकतेत

अहमदनगर दि.१२ सप्टेंबर

हॅलो तुमचं नाव अमुक अमुक का ? समोरच्याने हो उत्तर दिले की लगेच मी पतसंस्थे (institution) मधून बोलतेय तुमच्या नावावर सोने तारण कर्ज (gold mortgage loan ) आहे तुम्ही ठेवलेले सोन खोटअसल्याचं (gold you have deposited is fake )आमच्या निदर्शनास आले असून तुमची रक्कम आजपर्यंत एवढी झाली आहे त्यावर एक लाख रुपये देऊन हे प्रकरण मिटून घ्या अन्यथा तुमच्यावर केस करण्यात येईल असे उत्तर एक महिला देत असल्याने सोन तारण केलेल्या कर्जदारांचे धाबे दणाणले आहेत.

अहमदनगर शहरातील शहर सहकारी बँकेला खोटे सोने ठेवून कर्ज घेतल्याप्रकरणी फसवल्याचा गुन्हा कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला आहे मात्र आता या गुन्ह्याची व्याप्ती वाढणार असल्याचं समोर येत आहे.

रंगा बिल्ला(ranga billa) या जोडीने अनेक गरजू लोकांना फसवून आपले सोनं तुमच्या नावावर ठेवतो असे सांगून लाखो रुपयांचा गंडा घातल्याचं आता समोर येत आहे. विशेष म्हणजे रंगा बिल्ला पकडल्यानंतर अनेक पतसंस्था, बँका सध्या तरी शांत बसल्या आहेत मात्र भिंगार मधील एका पतसंस्थेने सोने तारण ठेवलेल्या कर्जदारांना फोन करून पैसे भरण्याचे सांगितलं आहे. मग हे सोनं खोटं होतं हे त्यांना आज कसे कळले हा प्रश्न आता समोर येत आहे.

जर तुम्ही ठराविक रक्कम भरली नाही तर तुमच्यावर केस करू असे सांगितले जात असल्यामुळे कर्जदार आता काय करावे अशा मानसिकतेत आहे. ज्या कर्जदाराची ऐपत दहा हजार रुपये भरण्याची नाही त्या कर्जदाराला लाखो रुपये दिल्याचं समोर येत आहे. त्यामुळे अनेक कर्जदारांनी वकिलांकडे कायदेशीर सल्ला घेण्यासाठी धाव घेतलीय.

आता या खोटे सोने देऊन कर्ज प्रकरण केल्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता असून अनेक गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. कारण नगर शहरासह उपनगर आणि नगर तालुक्यामध्ये खोटे सोने देऊन फसवल्याचे अनेक प्रकरणात समोर येऊ लागली आहेत. तर अनेक कर्जदारांकडे राहण्यासाठी घर नाही त्यांना लाख रुपये भरण्यास सांगितल्यामुळे ते आत्महत्या च्या मानसिकतेपर्यंत गेले असल्याचेही समोर आला आहे. तर काही कर्जदार आता पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन या प्रकरणाची सर्व सत्यता सांगणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version