Homeराजकारणमंत्रिमंडळाच्या विस्तारात नगर शहराला मंत्रीपदाची लॉटरी लागणार मंत्री संजय बनसोडे यांच्या वक्तव्याने...

मंत्रिमंडळाच्या विस्तारात नगर शहराला मंत्रीपदाची लॉटरी लागणार मंत्री संजय बनसोडे यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा नगरकरांच्या आशा पल्लवीत..

advertisement

अहमदनगर दि.२० जानेवारी

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होण्याचे सुतोवाच राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी आज अहमदनगर येथे पत्रकारांशी बोलताना केले आहे. संजय बनसोडे हे आज अहमदनगर मध्ये विविध विकास कामांच्या भूमीपूजन कार्यक्रमानिमित्त अहमदनगर शहरात आले होते.

अहमदनगर शहरातील वाडिया पार्क क्रीडा संकुलाची पाहणी क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्यासह अहमदनगर शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी केली माझ्याकडे निधीची कोणतीही कमतरता नाही त्यामुळे आमदार संग्राम जगताप हे जेवढा म्हणतील तेवढा निधी आपण देऊ असेही त्यांनी सांगितले.

अहमदनगर शहरातील अनेक वर्षांची मागणी असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णकृती पुतळ्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आज क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते संपन्न झाला.

राज्याचा लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असून अहमदनगर शहरातील आमचे मित्र आमदार संग्राम जगताप हे नामदार म्हणून दिसतील असा उल्लेख त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी केला त्यामुळे अहमदनगर शहराला मंत्रीपदाची लॉटरी येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या लागू शकते यावर आता शिक्का मोर्तब झाले आहे. खुद्द राज्याच्या क्रीडामंत्र्यांनीच हे सुतेवाच केल्याने राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आणि नगर शहराला मंत्रिपद मिळणार हे आता जवळपास निश्चित झाल्या या वक्तव्यावरून लक्षात येतेय.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular