अहमदनगर दि.२३ जानेवारी
सध्या मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील यांनी रान उठवले आहे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागणी करता मनोज जरांगे पाटील हे पायी मोर्चाने मुंबई कडे निघाले आहेत.तर ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी भूमिका ओबीसी समाजाने घेतली आहे या पार्श्वभूमीवर आता अहमदनगर मध्ये येत्या 3 तारखेला ओबीसी महाएल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्याची सध्या अहमदनगर मध्ये जय्यत तयारी सुरू असून आज नियोजनाची बैठक पार पडली.
या बैठकीसाठी जिल्हाभरातून पदाधिकारी आले होते. तर मेळाव्यासाठी 5 लाख लोक येतील असा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला आहे. तर ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. या मेळाव्यासाठी मंत्री छगन भुजबळ, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे, आमदार गोपीचंद पडळकर, कल्याण दळे, यांस इतर नेते उपस्थित राहणार आहे. तर छगन भुजबळ काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.३ फेब्रुवारी दुपारी ३ वाजता क्लेराब्रूस हायस्कूल मैदानावर हा मेळावा होणार आहे.