अहमदनगर दि.९ ऑक्टोबर
Maharashtra Politics: विधानसभा निवडणूक दिवाळी संपल्यानंतर म्हणजे नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होऊ शकते. साधारण 14 किंवा 15 नोव्हेंबरच्या आसपास विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील महायुती सरकारचा हुरुप वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. महायुतीकडून आगामी निवडणुकांसाठी (Vidhan Sabha Election 2024) 288 मतदारसंघात भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या समन्वयकांची नावे जाहीर करण्यात आली असून नगर शहर विधानसभा मतदार संघासाठी भारतीय जनता पार्टी कडून महेंद्र गंधे, राष्ट्रवादी काँग्रेस कडून सुमित कुलकर्णी आणि शिवसेनेकडून विठ्ठल लोखंडे यांना समन्वयक म्हणून नेमण्यात आले असून महायुतीचे होणारे इथून पुढचे कार्यक्रम या तिघांच्याही समन्वयाने होणार आहे.
महायुती कडून निवडणुकीची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून हरियाणा राज्यात भाजपच्या विजयामुळे भारतीय जनता पक्षासह महायुतीतील घटक पक्ष यांच्यामध्ये उत्साह वाढला आहे. त्यामुळे आता या लाटेचा उपयोग महायुती करून घेणार असून अनेक योजना सरकारने जाहीर केल्या आहेत त्यामुळे विरोधकांसमोर सध्या अनेक संकट उभा राहत आहेत आता जागावाटपावाची चर्चाही अंतिम टप्प्यात आलं असल्याचं महायुतीकडून सांगण्यात येत आहे त्यामुळे लवकरच निवडणुकीचे बिगुल वाजेल असेच दिसून येते आहे.
एक सर्वेक्षण करण्यात आले होते. विधानसभा निवडणुकांसाठी शिंदे गटाकडून करण्यात आलेला हा दुसरा सर्व्हे आहे. यामध्ये महायुतीला (Mahayuti) राज्यातील 177 जागांवर अनुकूल परिस्थिती असल्याची बाब निदर्शनास आली आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला 48 जागांपैकी अवघ्या 17 जागांवर विजय मिळवला होता. यामध्ये भाजपला नऊ, शिंदे गटाला 7 आणि अजितदादा गटाचा एका जागेवर विजय झाला होता. त्यामुळे महायुतीसाठी विधानसभा निवडणूक अवघड असल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र, ताज्या सर्वेक्षणाचा अहवाल पाहता महायुतीसाठी आशादायक चित्र असल्याची चिन्हं दिसत आहेत.