अहिल्यानगर दिनांक 9 ऑक्टोबर
अहमदनगर शहराचे आणि जिल्ह्याचे नाव अखेर अहिल्यानगर होणार असून यासाठी आता महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासन राजपत्रात याबाबत अधिसूचना जाहीर केली असून आता अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करण्यात कोणताही अडथळा राहिलेला नाही. अहमदनगर शहराचेच नाव नाही तर जिल्ह्याचे नाव ही आता यापुढे अहिल्यानगर असे होणार असून याबाबत राजपत्रांमध्ये तसा उल्लेख करण्यात आला आहे.
ज्याअर्थी, सामान्य प्रशासन विभाग, अधिसूचना क्र. गानाब- २७२२/प्र.क्र.- १५६ /जपुक
(२९), दिनांक ४ ऑक्टोबर, २०२४ अन्वये “अहमदनगर” शहराचे नाव “अहिल्यानगर” असे करण्याचे आदेश दिले आहेत.
त्याअर्थी, आता, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ (१९६६ चा महाराष्ट्र अधिनियम एक्केचाळीस) चे कलम ४ द्वारे प्रदान करण्यात आलेल्या आणि त्याबाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून याद्वारे सोबतच्या अनुसूचीच्या स्तंभ- १
मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या महसुली क्षेत्रांच्या नावामध्ये बदल करीत आहे आणि उक्त अनुसूचीच्या स्तंभ (२) मध्ये त्या प्रत्येकासमोर नमूद
केल्याप्रमाणे त्यांना नवीन नावे देत आहे:-
भाग चार-व-३७९
अनुसूची
अनु. क्र.
१
(१)
अहमदनगर जिल्हा
(२)
अहिल्यानगर जिल्हा
२
अहमदनगर उप विभाग
अहिल्यानगर उप विभाग
३
अहमदनगर तालुका
४
अहमदनगर गाव
अहिल्यानगर तालुका
अहिल्यानगर गाव
(१)