अहिल्यानगर दिनांक 24 डिसेंबर
महानगर पालिकेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून अर्ज विक्री आणि अर्ज स्वीकृती सुरू झाली आहे पहिल्याच दिवशी विक्रमी अर्जांची विक्री झाली असून अनेक दिवसांच्या प्रतीक्षे नंतर निवडणूक आल्याने प्रत्येक पक्षात इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी झाली आहे त्यामुळे कोणाला उमेदवारी द्यायची याचा पक्ष श्रेष्ठीं पुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.

नगर शहरात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या जागा वाटपाच्या चर्चा सुरू आहेत.अनेक अफवा आणि सोशल मीडियावर अनेक मेसेज रोज वेगवेगळे मेसेज फॉरवर्ड होत आहे. इच्छुक उमेदवार आपल्याला उमेदवारी कशी फिक्स आहे या बाबत तोंडाचा फेस गळे पर्यंत समोरच्याला सांगत असतो.
तर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या युती आघाडी बाबत सध्या सोशल मीडियावरून एक पोस्ट व्हायरल होत असून त्या मध्ये लिहिले आहे की..
“सर्व प्रभागांमध्ये युती होईल किंवा नाही होईल तरी सर्व उमेदवारांनी भारतीय जनता पार्टी म्हणून एकत्र येऊन निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न करा . राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्व प्रभागांमध्ये उमेदवार तयार करून ठेवले आहेत त्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने सुद्धा स्वबळावर तयारी करून ठेवणे.”
अशा आशयाचा हा मेसेज फॉरवर्ड केला जात असून त्यामुळे इच्छुक उमेदवारांची धडधड वाढत आहे.मात्र महायुती आणि महाविकास आघाडी मधील वरिष्ठांनी अद्याप पुढील रणनीती जाहीर केली नसल्याने सर्वच इच्छुक उमेदवार गॅसवर आहेत. मेसेज फॉरवर्ड होत असताना मात्र तो कोणी जाहीर केला याबाबत मेसेज मध्ये कोणताही उल्लेख नसल्याने हा खोडसाळपना असू शकतो.