HomeUncategorizedमनोज जरांगे यांच्या सभेची तयारी सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा...

मनोज जरांगे यांच्या सभेची तयारी सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा यांच्या माध्यमातून सुरू….

advertisement

अहमदनगर दि.३ ऑक्टोबर

अहमदनगर शहरात सात ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता एमआयडीसी येथील रेणुका माता मंगल कार्यालय येथे जाहीर सभा ठेवण्यात आली आहे. सात ऑक्टोबरला सायंकाळ सहा वाजता या सभेचे आयोजन करण्यात आले असून यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.

मराठा क्रांती मोर्चाची मशाल ही अहमदनगर जिल्ह्यातूनच पेटली होती त्यानंतर संपूर्ण राज्यात जवळपास 57 मोर्चे लाखोंच्या संख्येने निघाले होते त्याच अहमदनगर शहरात पुन्हा एकदा मनोज जरांगे यांच्या सभेच्या रूपाने मशाल पेटणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसह इतर मागण्यांचे प्रश्न सरकार दरबारी प्रलंबित आहेत सरकारला मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला चाळीस दिवसांचा वेळ संपत आलेला आहे त्यामुळे मराठा समाजात पुन्हा एकदा आंदोलनाची धग पेटवण्यासाठी मनोज जरांगे यांची ही सभा अत्यंत महत्वाची ठरणार आहे.

जरांगे पाटील यांच्या सभेच्या तयारीसाठी आज कोहिनूर मंगल कार्यालय येथे सकल मराठा समाजाच्या बांधवांची बैठक पार पडली. यामध्ये सभेच्या नियोजनात येणाऱ्या अडचणी आणि करण्यात येणारी तयारी यावर चर्चा करण्यात आली सभा यशस्वी करण्यासाठी मराठा बांधवांच्या डॉक्टर,वकील,इजिनियर,सामजिक,राजकीय, व्यावसायिक अशा सर्व स्थरातून पाठिंबा मिळत असून लाखोंच्या संख्येने सभेला मराठा समाजाच्या बांधवांची उपस्थिती राहील असा विश्वास यावेळी बैठकीत व्यक्त करण्यात आला.

सभेच्या दिवशी येणाऱ्या लोकांसाठीची वाहनतळ व्यवस्था, पाणी व्यवस्था, बैठक व्यवस्था तसेच मान्यवरांच्या बैठकीत व्यवस्था याबाबत चर्चा करण्यात आली तसेच हा मोर्चा शांततेत आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्वांनी जबाबदारीने काम करून पार पाडण्याचं सर्वानुमते ठरवण्यात आले.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular