HomeUncategorized112 ला खोटा कॉल.... शहरात होणार दंगल.. खोटा कॉल करणाऱ्या विरुद्ध पोलिसांनी...

112 ला खोटा कॉल…. शहरात होणार दंगल.. खोटा कॉल करणाऱ्या विरुद्ध पोलिसांनी केला गुन्हा दाखल..

advertisement

अहमदनगर दि. 3 ऑक्टोबर

अहमदनगर शहरातील रामवाडी चौक मांगेबाबा मंदिर परिसरात मुस्लिम समाजाचे युवक हिरवे झेंडे लावत असून या ठिकाणी कायदा सुव्यवस्था बिघडून दंगल होऊ शकते असा एक कॉल पोलिसांच्या 112 नंबर वर आल्यानंतर याचा मेसेज शहरातील तोफखाना पोलिसांना देण्यात आला तोफखाना पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी धाव घेतली. मात्र ज्या ठिकाणी घटना होऊ शकते असे सांगितले गेले त्या ठिकाणी अत्यंत शांतता होती कोणताही गडबड गोंधळ नव्हता मात्र पोलिसांनी तरीही त्या परिसरातील नागरिक सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय कार्यकर्ते यांच्याशी संपर्क साधून काही घटना घडली होती का याबाबत खातरजमा केली मात्र कोणत्याही अनुचित प्रकार अथवा वाद-विवाद अथवा दोन समाजात तेढ पसरेल अशी कोणतीही घटना अनेक दिवसांपासून घडली नसून ही केवळ अफवा असल्याचं पोलिसांच्या समोर आल्यानंतर पोलिसांनी ज्या नंबर वरून हा कॉल आला होता त्यावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्या इसमाने फोन उचलला नाही अखेर पोलिसांनी या घटनेची स्टेशन डायरीत नोंद घेऊन पोलिसांना खोटी माहिती देणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस कॉन्स्टेबल गोरख मच्छिंद्र धाकतोडे यांच्या तक्रारीवरून तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये भादवि कलम 182 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांना खोटी माहिती देऊन दिशाभूल करणे या आरोपाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस प्रशासनाने 112 हा नंबर सर्वसामान्य जनतेसाठी खुला केला आहे यावर माहिती दिल्यानंतर काही वेळातच पोलीस तातडीने त्या ठिकाणी पोहोचतात मात्र अशा प्रकारे खोटी माहिती देऊन जर पोलिसांची धावपळ होत असेल तर भविष्यामध्ये लांडगा आला रे आला असं होऊ शकते आणि खऱ्या माणसाला मदत मिळणार नाही. त्यामुळे 112 ला फोन करताना सर्व माहिती खरी असावी कोणतीही अफवा अथवा खोटी माहिती देऊन पोलीस प्रशासनाची धावपळ करू नये असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular