नवी मुंबई दि .२६ जानेवारी
मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागणी करता मनोज दरांगे पाटील यांच्यासह लाखो मराठे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत आता हे मराठ्यांचे भगवं वादळ मुंबईच्या वेशीवर जाऊन धडकले असून त्यामुळे सरकारमध्ये आता वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत कालपासून दोन शिष्टमंडळे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आले होते मात्र अद्यापही कोणता तोडगा निघाला नसल्याने मोर्चा पुढे सुरूच राहणार असल्याची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी ठेवली आहे.
सरकारी अधिकारी निर्णय पोचवण्यासाठी आले होते. ज्या 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना प्रमाणपत्र देण्यासाठी गावोगावी शिबिर सुरू करण्यात आले आहेत. सामान्य प्रशासनाने 57 लाख नोंदी सापडले असल्याची माहिती दिली. त्यापैकी 37 लाख लोकांना प्रमाणपत्र वितरित केली असल्याची सरकारची माहिती. शिंदे समितीची मुदत दोन महिने वाढवली. ज्या बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले आहे त्यांच्या सोयऱ्याना शपथपत्र करून द्यायचे आहे “हा माझा सोयरा आहे” त्या आधारावर त्यांनाही प्रमाणपत्र दिले जाणार. वंशावळ जुळवण्यासाठी एक समिती गठित केली. अंतरवली सराटी पासून महाराष्ट्रभर मराठा आंदोलन करणाऱ्या बंधवांवरील गुन्हे मागे घेणार. मुलींना शंभर टक्के शिक्षणा मध्ये फी माफी.सग्या सोर्यंच बाबतच्या अध्यादेशावर सर्व सचिव मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीयांनी सह्या केल्या आहेत तो आदेश लवकर दिला जाईल. मात्र सगे सोयर्यांचा अध्यादेश कढे पर्यंत इथेच थांबणार आहे. उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत अध्यादेश आला नाही तर आझाद मैदानावर जाणार असल्याचा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे
आज पुन्हा सरकारच्या वतीने एक शिष्टमंडळ आले होते शिष्टमंडळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चर्चा झाली. त्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी वकिलांशी चर्चा केली. सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेबाबत माहिती दिलीय शिष्टमंडळाने चर्चा करण्याबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर मनोज जरांगे पाटील यांनी मोबाईलवरून चर्चा केली.
लाखो मराठा आंदोलकांनी सभेच्या ठिकाणी पहाटेपासून गर्दी केली आहे.बाजार समिती मुख्यालय आवारात आंदोलकांनी प्रचंड गर्दी केली होती. आंदोलकांकडून एक मराठा लाख मराठा च्या घोषणा सुरू होत्या त्यामुळे सर्व परिसर घोषणांनी दुमदुमला होता.